चारशे होमगार्डचे ५२ दिवसांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:08+5:302021-07-01T04:12:08+5:30

शहरातील भद्रकाली, अंबड, सातपूर, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर, सरकारवाडा, गंगापूर, नाशिकरोड, मुंबई नाका, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ...

52 days honorarium of 400 home guards exhausted | चारशे होमगार्डचे ५२ दिवसांचे मानधन थकले

चारशे होमगार्डचे ५२ दिवसांचे मानधन थकले

Next

शहरातील भद्रकाली, अंबड, सातपूर, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर, सरकारवाडा, गंगापूर, नाशिकरोड, मुंबई नाका, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्तासाठी मागील चार महिन्यांपासून होमगार्ड पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उभे आहेत. गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सुमारे चारशे होमगार्ड मदतीला घेण्यात आले आहेत. परंतु जानेवारीचे ३१दिवस, एप्रिलचे दहा दिवस आणि मे महिन्याचे अकरा दिवस असे एकूण ५२ दिवस कोरोना महामारी काळात जीवाची पर्वा न करता पोलिसांच्या बरोबरीने नाकाबंदी, गस्तीवर कर्तव्य बजावूनसुध्दा मानधनाची रक्कम चारशे होमगार्डच्या पदरात पडलेली नाही हे विशेष!

--इन्फो--

चारशे होमगार्डचे मानधन एक कोटीच्या घरात

बंदोबस्तासाठी हजर असलेल्या होमगार्डला प्रत्येकी एक दिवसाचे ६७० रुपये याप्रमाणे मानधन दिले जाते. याप्रमाणे एका होमगार्डचे ३४ हजार ८५० रुपये थकले आहेत, तर एकूण चारशे होमगार्डचे मिळून १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम थकली आहे.

Web Title: 52 days honorarium of 400 home guards exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.