दगडफेकप्रकरणी ५२ जणांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 10:00 PM2021-11-23T22:00:06+5:302021-11-23T22:00:06+5:30
मालेगाव : दगडफेक व दंगलप्रकरणी आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली असून, यातील ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. दंगलीच्या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या २२ जणांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मोहम्मद जाहिद अनिस मेमन याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अब्दुल रहेमान अब्दुल राशिदला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आक्षेपार्ह व्हिडिओच्या दाखल गुन्ह्यात नगरसेवक अयाज हलचल यांची गेल्या आठवड्यात जामिनावर मुक्तता झाली आहे. शहरात गेल्या १२ नोव्हेंबरला दगडफेक व तोडफोडीचा प्रकार घडला होता. पोलिसांनी प्रारंभी शहर व आयशानगर पोलीस ठाण्यांमध्ये विविध पाच गुन्हे दाखल केले होते.
आक्षेपार्ह व्हिडिओचा शोध घेत आझादनगर व किल्ला पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले होते. या ९ गुन्ह्यांमध्ये ५५ जणांवर अटकेची कारवाई केली होती. दगडफेकीच्या पहिल्या गुन्ह्यात अटक केलेल्या २२ जणांना दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केले होते. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने संशयितांना नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.