दगडफेकप्रकरणी ५२ जणांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:04 AM2021-11-24T01:04:14+5:302021-11-24T01:04:36+5:30

दगडफेक व दंगलप्रकरणी आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली असून, यातील ५२ जणांना न्यायालयीन काेठडी सुनवण्यात आली आहे. दंगलीच्या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या २२ जणांची साेमवारी न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.

52 remanded in stone-throwing case | दगडफेकप्रकरणी ५२ जणांना न्यायालयीन कोठडी

दगडफेकप्रकरणी ५२ जणांना न्यायालयीन कोठडी

Next

मालेगाव : दगडफेक व दंगलप्रकरणी आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली असून, यातील ५२ जणांना न्यायालयीन काेठडी सुनवण्यात आली आहे. दंगलीच्या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या २२ जणांची साेमवारी न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली. माेहम्मद जाहिद अनिस मेमन याला २४ नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे. अब्दुल रहेमान अब्दुल राशिदला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आक्षेपार्ह व्हिडिओच्या दाखल गुन्ह्यात नगरसेवक अयाज हलचल यांची गेल्या आठवड्यात जामिनावर मुक्तता झाली आहे. शहरात गेल्या १२ नाेव्हेंबरला दगडफेक व ताेडफाेडीचा प्रकार घडला हाेता. पाेलिसांनी प्रारंभी शहर व आयशानगर पाेलीस ठाण्यांमध्ये विविध पाच गुन्हे दाखल केले हाेते. आक्षेपार्ह व्हिडिओचा शाेध घेत आझादनगर व किल्ला पाेलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे नाेंदविण्यात आले हाेते. या ९ गुन्ह्यांमध्ये ५५ जणांवर अटकेची कारवाई केली हाेती. दगडफेकीच्या पहिल्या गुन्ह्यात अटक केलेल्या २२ जणांना दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केले हाेते. त्यांची पाेलीस काेठडी संपल्याने त्यांना साेमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन काेठडी सुनावल्याने संशयितांना नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: 52 remanded in stone-throwing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.