जिल्ह्यात ५२०६ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 01:50 AM2021-05-01T01:50:05+5:302021-05-01T01:51:09+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ रुग्णांची वाढ झाली. सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे.

5206 patients overcome corona in the district | जिल्ह्यात ५२०६ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात ५२०६ रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्दे संसर्ग : ३४४९ नवे रुग्ण; दिवसभरात ४० जणांचा झाला मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ रुग्णांची वाढ झाली. सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे.
मनपा क्षेत्रामध्ये १८२०, तर ग्रामीणला १८२१ आणि मालेगाव क्षेत्रात ८४ व जिल्हाबाह्य २४ रुग्णबाधित आहेत. जिल्ह्यात मनपा क्षेत्रात २४, ग्रामीणला १४ , मालेगाव मनपा १ आणि जिल्हाबाह्य १ असा एकूण ४० जणांचा बळी गेला. 
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने काहीशी घट होत असल्याने आरोग्ययंत्रणेला दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उपचारार्थी ४० हजारांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४०,८१६ वर पोहोचली आहे. त्यात २२ हजार ४७४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १६ हजार ३७७ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ७२० मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २४५ रुग्णांचा समावेश आहे. 
बाधितांमध्ये ग्रामीण पुढे 
जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत सातत्याने नाशिक शहरच आघाडीवर रहात होते. मात्र, शुक्रवारी ग्रामीणची बाधित संख्या १८२१ अशी केवळ एका रुग्णसंख्येने पुढे आहे. मात्र, ग्रामीणमधील बळींचा आकडा गत तीन दिवसांच्या तुलनेत नाशिक शहरापेक्षा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास राहात आहे. कोरोनाचे संकट पाहता नागरिक निर्बंधांबाबत तितकेसे दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

Web Title: 5206 patients overcome corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.