राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा
By admin | Published: February 15, 2015 11:01 PM2015-02-15T23:01:14+5:302015-02-15T23:01:33+5:30
राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा
नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले
परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ हजार ५८० प्रकरणे ठेवण्यात आली
होती़
जिल्हाभरात बँकेची दिवाणी स्वरूपातील ११६ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली काढण्यात
आली़ एनआय अॅक्ट कलम
१३८ अर्थात धनादेश न वटल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल झालेली
११ अपिले ठेवण्यात आली
होती़
त्यापैकी २ प्रकरणे निकाली निघाली, तर धनादेश न वटल्याच्या १०२० प्रकरणांपैकी २३३, तर बँकेच्या दावा दाखलपूर्व ५४३३ प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़
यामध्ये ३ कोटी ६ लाख १६ हजार ६९१ रुपयांची तडजोड करण्यात आली़
या राष्ट्रीय लोकअदालतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम, जी़ ए़ रामटेके, व्ही़ जी़ रघुवंशी, व्ही़ पी़ कदम, एस. एम. पाटील, ए़ एस़
भागवत, उल्का जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)