५३ लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:46 PM2018-11-27T18:46:57+5:302018-11-27T18:47:12+5:30

वणी : पोलीस ठाण्याच्या हद्यीत नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाटाच्या दरम्यान सापळा रचुन सापुता-या ...

53 lakhs of gutka seized | ५३ लाखाचा गुटखा जप्त

५३ लाखाचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देवणी : नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेची मोठी कारवाई

वणी : पोलीस ठाण्याच्या हद्यीत नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाटाच्या दरम्यान सापळा रचुन सापुता-या कडुन वणीकडे येणारा ट्रक अडवुन चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला. त्यांची चैकशी केला असता त्यात सुमारे ४२ लाख रूपये किमतीचा अवैध गुटखा सापडला हा ट्रक (ट्रक सहित ५३ लाख रूपये किमतीचा) गुन्हे शाखेने वणी पोलीस ठाण्यात आणला तपासणी केली. त्यात गुटखा असल्याचे समजल्याने वणी पोलीसांनी अन्न व औषधे प्रशानास या बाबत माहिती देण्यात आली. या बाबत वणी पोलीस ठाण्यात प्रमोद शिवलाल पाटील अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न व औषधे प्रशासन, नाशिक) यांच्या तक्र ारी वरून दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यात चालक उध्दव रामराव राठोड रा. चिमेगांव, ता औराई, जि. बिदर ह. मु भिरवड फाटा पिंपरी चिंचवड व गाडी मालक निलेश रामराव महानवर रा. भिरवड फाटा, पिंपरी चिंचवड यांच्या विरोधात अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेलला प्रकार असा दि. २६ रोजी वणी पोलीस ठाण्याच्या हद्यीतील करंजखेड फाटा येथे नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार अवैध गुटखा घेवुन जाणाऱ्या गाडी बद्दल माहिती मिळाली होती. त्या नुसार ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्त्यावर सापळा रचला होता. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सापुताºया कडून वणीच्या दिशेने येणारा आयशर ट्रक (एम. एच. १४ ई एम ३४९७) या पथकाने अडवून चालकास ताब्यात घेतले. वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले मुद्येमाला सहित अटक केली माहिती कळविल्याने अन्न व औषधे प्रशासनाचे प्रमोद पाटील यांनी संपुर्ण मालाची तपासणी केली असता सत्तर गोण्यामध्ये पॅकींग केलले सदर छाप्यात आर एम डी सुगंधी तंबाखु, मिराज सुगंधी तंबाखु, तुलसी रॉयल जाफरानी सुगंधी तंबाखु, रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, व्ही सुगंधी तंबाखु असा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु असलेल्या गोण्या मधील ३०,६०० पुडे किंमत ४२ लाख ८ हजार ६०० व आयशर ट्रक असा एकुण ५३ लाख ८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आर एम डी रजनीगंधा, विमल असा पान मसाला व त्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखुच्या पस्तीस गोण्या तंबाखुच्या गोण्या होत्या तपासणी करून पोलीसांनी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपुर्ण माल हा अन्न व औषधे प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला चालकास अटक करण्यात आली असुन गाडी मालकाचा शोध सुरू आहे.
नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, स.पो.नि. आशीष आडसुळ, पो.हवा दिपक आहिरे, संजय गोसावी, पुंडलीक राऊत, दिलीप घुले, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पो.ना. अमोल घुगे प्रविण सानप, पो. कॉ. विश्वनाथ काकड यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

Web Title: 53 lakhs of gutka seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.