जिल्ह्यातील ५३२ तलाठ्यांना मिळाला नवा लॅपटॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:27+5:302021-04-06T04:13:27+5:30

नाशिक : डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड माॅडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाउड सर्व्हरबरोबर जोडणी ...

532 talattas in the district got new laptops | जिल्ह्यातील ५३२ तलाठ्यांना मिळाला नवा लॅपटॉप

जिल्ह्यातील ५३२ तलाठ्यांना मिळाला नवा लॅपटॉप

Next

नाशिक : डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड माॅडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाउड सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्याची योजना शासनाने आखली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ई-फेरफार कार्यक्रमासाठी लॅपटॉप देण्यात आलेला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ५३२ तलाठी आणि ९२ मंडळ अधिकाऱ्यांना झाला आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या लॅपटॉपला क्लाउड सर्व्हरबरोबरच जोडणी केली जाणार आहे. त्यामुळे ई-फेरफारच्या कामाला गती प्राप्त होणार आहे. यापूर्वी या कामासाठी काही तलाठ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वत:चे लॅपटॉप घेतले होते. आता सर्वांनाच शासनाच्या योजनेतून लॅपटॉप मिळाला असल्याने जिल्ह्यातील माॅडर्नायझेशन प्रोग्रामचे काम गतीने होण्यास मदत होणार आहे.

--इन्फो--

तालुकानिहाय दिलेले लॅपटॉप

तालुक तलाठी मंडळ अधिकारी

नाशिक ४२ ८

दिंडोरी ४२ ७

पेठ २० ३

इगतपुरी ३३ ६

त्र्यंबकेश्वर १९ ३

निफाड ५५ ९

सिन्नर ३९ ७

मालेगाव ५७ १०

चांदवड ३५ ६

देवळा १९ ३

बागलाण ४७ ८

कळवण ३५ ६

सुरगाणा २८ ५

येवला ३४ ६

नांदगाव २७ ५

-- बॉक्स--

तलाठी - ५३२

मंडल अधिकारी - ९२

--इन्पो--

तलाठ्यांना प्रथमच मिळाले शासनाचे लॅपटॉप

संगणीकृत कार्यक्रणालीच्या माध्यमातून ई-फेरफार कार्यक्रमासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप सक्तीचा करण्यात आला आहे.

जसजसे डिजिटलयाझेशन होत गेले तसतसे लॅपटॉपची गरज भासू लागल्याने अनेक तलाठी अणि मंडळ अधिकाऱ्यांनी स्वत:चे लॅपटॉप खरेदी केले. त्यानुसारच त्यांचे कामकाज सुरू होते. यापूर्वी त्यांना शासनाकडून लॅपटॉप प्राप्त झालेले नसल्याने यंदा त्यांना प्रथमच लॅपटॉप प्राप्त झाले आहेत. आता शासनाच्या धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना शासकीय लॅपटॉपचला लाभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ३५५, तर दुसऱ्या टप्प्यात २६९ इतके लॅपटॉप देण्यात आले आहेत. या लॅपटॉपचे वितरण करण्यात आलेले आहे.

Web Title: 532 talattas in the district got new laptops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.