दोन दिवसांत ५३८५ कोरोनामुक्त; ४६९६ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 01:43 AM2022-01-28T01:43:19+5:302022-01-28T01:43:37+5:30

जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) आणि गुरुवारी (दि. २८) झालेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गत दोन दिवसांत एकूण ५३८५ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ४६९६ बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत मिळून एकूण ७ बळींची नोंद झाल्याने एकूण बळींची संख्या ८७९२ वर पोहोचली आहे.

5385 corona free in two days; 4696 interrupted | दोन दिवसांत ५३८५ कोरोनामुक्त; ४६९६ बाधित

दोन दिवसांत ५३८५ कोरोनामुक्त; ४६९६ बाधित

Next
ठळक मुद्देबुधवार, गुरुवारच्या दोन दिवसांत एकूण ७ बळी

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २७) आणि गुरुवारी (दि. २८) झालेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गत दोन दिवसांत एकूण ५३८५ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ४६९६ बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत मिळून एकूण ७ बळींची नोंद झाल्याने एकूण बळींची संख्या ८७९२ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत अनुक्रमे २३९६ आणि २३०० इतकी वाढ झाली. तर, बुधवारी २ आणि गुरुवारी ५ नागरिक याप्रमाणे ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण उपचारार्थींची संख्या १७ हजार ३२१ वर पोहोचली आहे. त्यात ११४८१ नाशिक मनपा, ५३८७ नाशिक ग्रामीण, २७५ मालेगाव मनपा तर १७८ जिल्हा बाह्य उपचारार्थींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात घट झाली असून ते प्रमाण ९४.३१ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या १८८६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे १३६८, ३१० नाशिक मनपाचे ९४.११ टक्के, मालेगाव मनपा २०८ असे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 5385 corona free in two days; 4696 interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.