५४ लाखांची फसवणूक : खोडे कुटुंबियांच्या जमीनीचा परस्पर व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:47 PM2019-02-05T14:47:23+5:302019-02-05T14:51:01+5:30

जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती खरी असल्याचे भासवत संशयित गुंजाळ याने संगमनेर तालुक्यातील कुंभार मळा भागात राहणारे शाहीदखान रहिमखान मन्सुरी (४४) यांची ५४ लाखांची फसवणूक जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

54 lakh cheating: Khodade's land interaction | ५४ लाखांची फसवणूक : खोडे कुटुंबियांच्या जमीनीचा परस्पर व्यवहार

५४ लाखांची फसवणूक : खोडे कुटुंबियांच्या जमीनीचा परस्पर व्यवहार

Next
ठळक मुद्देजागेची बनावट कागदपत्रे तयार केलीखोटी कागदपत्रे संशयिताने ती खरी असल्याचे भासवून खरेदी खत

नाशिक : खोडे कुटुंबातील पाच व्यक्तींच्या नावे असलेल्या वडाळागावातील जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करत बनावट कागदपत्रांचा आधार घेत एका भामट्याने १६ गुंठे जमीन परस्पर ५४ लाख रुपयांत विक्री करत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित मुक्ताजी ऊर्फ मुकेश सखाराम (रा. मैथिली सोसायटी, मुंबईनाका) गुंजाळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती खरी असल्याचे भासवत संशयित गुंजाळ याने संगमनेर तालुक्यातील कुंभार मळा भागात राहणारे शाहीदखान रहिमखान मन्सुरी (४४) यांची ५४ लाखांची फसवणूक जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. गुंजाळ याने वडाळागावातील खोडेनगर परिसरातील रहिवासी विलास ऊर्फ बाळू जगन्नाथ खोडे, कारभारी विठोबा खोडे, दत्तू कारभारी खोडे, वत्सलाबाई जगन्नाथ खोडे, विजया बाजीराव खोडे, योगेश बाबूराव खोडे यांच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ९/१ ते ९/९/१ (अ) क्षेत्रातील ०.१६.५ आर क्षेत्रातील वरील जागेची बनावट कागदपत्रे तयार केली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट भूमिअभिलेख कार्यालयाचा भाग अर्ज नमुना १२ व ७/१२चा फेरफार उतारा तयार केला. ही सर्व खोटी कागदपत्रे बनविल्यावर संशयिताने ती खरी असल्याचे भासवून वरील जमिनीचे खरेदी खत दिनांक २६जुलै २०१३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले. मन्सुरी यांच्याकडून ५४ लाख रु पये भरून घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, कालांतराने फसवणूक झाल्याचा हा प्रकार मन्सुरी यांच्या लक्षात आला. त्यानुसार त्यांनी संशियत मुक्ताजी गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली, तसेच त्यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयित गुंजाळने त्यांना दाद दिली नाही. त्यांनी याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीनुसार गुंजाळवर फसवणुकीसह बनावट कागदपत्रे बनवून ती सरकारी कार्यालयात सादर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळ फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके करीत आहेत.

Web Title: 54 lakh cheating: Khodade's land interaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.