राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त लावणार ५४ हजार वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:13+5:302021-06-27T04:11:13+5:30
संपूर्ण देशाला आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून योग्य दिशा दाखविणारे कडवे प्रवचनकार तरुणसागरजी महाराज यांच्या ५४ व्या अवतरण दिवस हा तरुणोत्सव ...
संपूर्ण देशाला आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून योग्य दिशा दाखविणारे कडवे प्रवचनकार तरुणसागरजी महाराज यांच्या ५४ व्या अवतरण दिवस हा तरुणोत्सव पर्व म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये सर्वप्रथम ५४ व्या अवतरण दिवसानिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये ५४ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी गुरु परिवारचे नीलेश सेठी, सुनील सेठी, अमोल पाटनी, विलास साहूजी, सचिन कासलीवाल, विजय पाटोदी, सचिन बडजाते, अनुज दगडा, राहुल पांडे, गौरव कासलीवाल, रोहित गंगवाल, प्रीतम पाटणी आदींसह समाजबांधव उपस्थित होते. तसेच शनिवारी औरंगाबाद शहरातील गुरु परिवारातील सदस्य हे या तरुणोस्तव पर्वाचे दीपप्रज्वलन मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शमीम आलम, जमनालाल जैन, पारस लोहाडे, महेश श्रीमल, औरंगाबाद गुरु परिवाराचे नीलेश सेठी, सुनील सेठी, पवन पाटनी, सावन चुडीवाल, हितेंद्र मेहता उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद येथे सकळी तरुण सागरजी चौक, सेव्हन हिल येथे पुष्प अर्पण व विनयांजली होणार आहे. तसेच सेंट्रल नाका येथे वृक्षारोपन करण्यात येणार आहे. दुपारी घाटी येथे अन्नदान चिकलठाणा गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आल्याची माहिती गुरु परिवाराचे आयोजन समिति संयोजक पारस लोहाडे यानी दिली