जिल्ह्यात ५५ कोरोना बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:47 AM2021-04-23T01:47:15+5:302021-04-23T01:47:37+5:30
काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२) पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे.
नाशिक : काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२) पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३,३७५, तर नाशिक ग्रामीणला २,२७४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १९१ व जिल्हाबाह्य ८८ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला ४२, मालेगाव मनपात १ आणि जिल्हाबाह्य १ असा एकूण ५५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक
राहिली होती. त्यामुळे यंत्रणेत चिंता कायम आहे.
ग्रामीणला बळींची संख्या चिंताजनक
आठवडाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील बळींची संख्या शहरातील बळींच्या तुलनेत सातत्याने अधिक आहे. बुधवारी नाशिकला ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक शहरातील रुग्णसंख्येत मोठी भर पडूनदेखील ग्रामीणच्या बळींची संख्या शहरापेक्षा अधिक होती. गुरुवारीही शहरातील ११ बळींच्या तुलनेत जवळपास चौपट म्हणजे ४२ बळी ग्रामीणला गेले आहेत.
उपचारार्थी ४६ हजारांवर
जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४६ हजार ९६७ वर जाऊन पोहोचली आहे.