सात गावांमध्ये सामाजिक सभागृहांसाठी ५५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:44 PM2018-11-13T17:44:33+5:302018-11-13T17:44:46+5:30

सिन्नर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील ७ गावांमध्ये सामाजिक सभागृहास ५५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

55 lakhs for a social hall in seven villages | सात गावांमध्ये सामाजिक सभागृहांसाठी ५५ लाख

सात गावांमध्ये सामाजिक सभागृहांसाठी ५५ लाख

Next

सिन्नर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील ७ गावांमध्ये सामाजिक सभागृहास ५५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती येथील विकास कामांसाठी सन २०१८- १९ मध्ये तालुक्यातील कामासांठी आमदार वाजे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ७ गावांमध्ये ५५ लाख रूपये मंजूर झाले आहेत. नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत ही योजना राबविण्यात आली आहे.
सिन्नर तालुक्यातील गोंदे, शहा, पाथरे, वावी, निमगाव सिन्नर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ७ लाख ५० हजार रूपये मंजूर झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सिन्नर मतदार संघातील व इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद गटातील भरवीर बुद्रुक येथे १० लाख व आंबेवाडी येथे ७.५० लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Web Title: 55 lakhs for a social hall in seven villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक