कळवण शहरात ५५ टक्के मतदान

By Admin | Published: October 15, 2014 11:28 PM2014-10-15T23:28:59+5:302014-10-16T01:19:05+5:30

कळवण शहरात ५५ टक्के मतदान

55 percent polling in Kalwan city | कळवण शहरात ५५ टक्के मतदान

कळवण शहरात ५५ टक्के मतदान

googlenewsNext


कळवण : विधानसभेसाठी आज झालेल्या निवडणुकीत मतदारांमध्ये सकाळीस अखेरपर्यंत कमालीचा उत्साह दिसून आल्याने सरासरी मतदानाच्या टक्केवारीमध्ये देखील वाढ होताना यादीचा घोळ जाणवला. मागील निवडणुकीत मतदान करून देखील यंदा मतदान यादीत नाव न सापडल्याने शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्येंत सरासरी ६२ . २६ टक्के तर कळवण शहरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत ५५ .५२ टक्के मतदान झाले.
पाच वाजेपर्यंत कळवण तालुक्यात ५८ .४५ टक्के तर सुरगाणा तालुक्यात ६६ .६४ टक्के असे ६२ .२६ टक्के मतदान झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार ए. टी. पवार, भाजपचे उमेदवार यशवंत गवळी, माकपचे जे. पी. गावित ,कॉंग्रेसचे डी. के. गांगुर्डे यांच्यासह खासदार हरिश्चंद्र चव्हाण ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयश्री पवार , रवींद्र देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख ,शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी मतदान करून घेण्याचे आवाहन केले.












जिल्हा बँकेचे माजी चेअरमन मोतीराम हरी पाटील यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी मतदानाच हक्क बजावला. दळवट येथे राष्ट्रवादीचे उमेदवार ए. टी. पवार ,भाजपचे यशवंत गवळी यांनी विठेवाडी( पाळे) तर करभेळ येथे कॉंग्रेसचे उमेदवार डी. के. गांगुर्डे तर माकपचे उमेदवार ज.े पी. गावित यांनी अलुंगण येथे मतदानाच हक्क बजावून विविध मतदार केंद्रांना भेटी दिल्यात. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढलेली दिसून आली आदिवासी भागात दुपारी १२ वाजेपर्यंत ६० टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होते. कळवण व सुरगाणा तालुका मिळून मतदार संघ असल्याने आदिवासी व दुर्गम भागातील मतदान केंद्राध्यक्ष यांना येण्यास उशीर होणार असल्याने आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

Web Title: 55 percent polling in Kalwan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.