५५ वर्षे वयावरील भाजी विक्रेत्यांना पाठविले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:15 PM2020-05-15T21:15:48+5:302020-05-15T23:32:22+5:30
नांदगाव : भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते यांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
नांदगाव : भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते यांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी कोरोनाचा ज्येष्ठांना अधिक धोका लक्षात घेऊन ५५ वर्षे वयावरील विक्रेत्यांना समज देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले.
येथील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी बाजार भरविण्यात आला होता. यामध्ये भारतीय जैन संघटना फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते मिळून २८२ विक्रेत्यांची यावेळी तपासणी करण्यात आली.
त्यापैकी २५४ विक्रेत्यांना कोणतेही लक्षणे आढळून आली नाही. उर्वरित विक्रेत्यांना त्यांच्या जुन्या आजाराची लक्षणे आढळून आली. तर ५५ वर्षावरील विक्रेत्यांना समज देऊन घरी पाठविण्यात
आले. या तपासणीत कोरोनाची लक्षणे निदर्शनास आली नसली
तरी व्ही.जे. हायस्कूल मैदानावर शहरातील सर्व किराणा दुकानदार व दुकानातील काम करणारे कर्मचारी, सर्व मेडिकल स्टोअर्स, दूध
डेअरी व मटन विक्रेते यांची
वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याने शहरातील सर्व व्यावसायिकांनी तपासणी करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी केले
आहे. यासाठी डॉ. नितीन जैन तसेच नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी गुलाबराव नवले, वैभव चिंचोले, रोशनी मोरे, अनिल बुरकूल, बी.टी. घुगे, नारायण कोटमे, वाल्मीक गोसावी व उमेश चंडाले हे प्रयत्न करीत आहेत.