साडेपाच लाखांची बिअर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:39 AM2018-07-15T01:39:01+5:302018-07-15T01:39:23+5:30

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध्ये मद्याची वाहतूक करणाºया वाहनासह साडेपाच लाखांचा बिअरचा साठा जप्त केला़

 5,500 crores of beer seized | साडेपाच लाखांची बिअर जप्त

साडेपाच लाखांची बिअर जप्त

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क : परराज्यातील मद्याची वाहतूक; एकास अटक

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध्ये मद्याची वाहतूक करणाºया वाहनासह साडेपाच लाखांचा बिअरचा साठा जप्त केला़
म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरील हॉटेल राऊसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाची वाहन तपासणी सुरू होती़ यावेळी मारुती कारमध्ये (एमएच १५, इपी २२१) केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेला ट्युबर्ग आणि किंगफिशर स्ट्रॉँग बिअरचा साठा आढळून आला.
कारचालक ललित गोविंद गायकवाड (रा. सूर्यवंशी जीमजवळ, पेठरोड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडवरील उमाई
बिअर शॉपी येथे आणखी
साठा असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने बिअर शॉपीची
तपासणी केली असता २० हजार १६० रुपये किमतीची बिअर आढळून आली़
मारुती कारही जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारुती कारसह ५ लाख ४८ हजार रुपये किमतीचा बिअर साठा जप्त करण्यात आला आहे. दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे अधिक तपास करीत आहेत. ही कारावाई निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक पोटे, एस. एस. रावते, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली असून संशयित ललित गायकवाड यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

Web Title:  5,500 crores of beer seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.