मिशन झीरोअंतर्गत चार दिवसात नाशकात ५५५७ अॅँटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 07:02 PM2020-07-26T19:02:24+5:302020-07-26T19:03:20+5:30
नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
प्रशासनाबरोबरच बीजेएसच्या अॅँटिजेन चाचण्या वाढत असून त्या प्रमाणात पॉझिटीव्ह रु ग्णदेखील अधिकाधिक संख्येने मिळत आहेत. अशा पद्धतीने पॉझिटीव्ह रु ग्णांना लवकर शोधून काढणे हा कोरोना प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. अशा संशयित आणि बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करणे, समुपदेशन करणे यामुळे रु ग्ण लवकर बरे होतील व त्याबरोबरच पुढील होणारे संक्र मणही थांबवता येईल.
पहिल्याच दिवशी ६६, दुसऱ्या दिवशी १०५, तिसºया दिवशी १६१ व चौथ्या दिवशी २०१ अशा चढत्या क्र माने पॉझिटीव्ह रु ग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. फक्त चारच दिवसात ५७५७ व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करून ५३३ पॉसिटीव्ह रु ग्णांना शोधून काढण्यात मिशन झीरो नाशिक या अभियानात यश मिळाले आहे.
मिशन झीरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेच्या चौथ्या दिवशी महानगरपालिकेने आखून दिलेल्या जुने नाशिक, फुलेनगर, शिवाजी चौक, दसक पचक, समतानगर-टाकळी, मोरेमळा-रामवाडी, कामटवाडे, अशोकनगर-सातपूर, दत्तनगर, बिडीकामगार, पवारवाडी, संजयनगर-वाल्मीकनगर, कालिकानगर-फुलेनगर, राणाप्रताप चौक, सिन्नर फाटा, हिरवाडी, आर्टिलरी सेंटर-जय भवानी रोड, पाथर्डी-दोंदे मळा या कंटेन्मेंट झोनमध्ये मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे रु ग्णांच्या अँटिजेन चाचणी करण्यात आल्या . त्यापैकी पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रु ग्णांना गृह विलगीकरण किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली. आजच्या मिशन झीरो नाशिक मध्ये महानगरपालिका चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते सैफी अॅम्बुलन्स कॉर्पसचे सेवाभावी कार्यकर्ते, गुरु द्वारा नाशिकरोड, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशिअन, आशा सेविका, शिक्षिका हे सहभागी होत आहेत. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत अँटिजेन चाचण्या करून घ्याव्यात व कोविड मुक्त नाशिकच्या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, बीजेएसचे प्रकल्प समन्वयक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटरग्रेसचे चेतन बोरा, डॉ. उल्हास कुटे यांनी केले आहे.