५६ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:41 AM2018-05-26T00:41:51+5:302018-05-26T00:41:51+5:30

सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तके वितरणास येथील भांडारातून प्रारंभ झाला असून, शुक्रवारअखेर सुमारे ५६.५९ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांना सुमारे ९५ लाख ४२ हजार पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

 56 percent textbooks supply | ५६ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा

५६ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा

Next

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तके वितरणास येथील भांडारातून प्रारंभ झाला असून, शुक्रवारअखेर सुमारे ५६.५९ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांना सुमारे ९५ लाख ४२ हजार पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे.  शासनाच्या सर्वशिक्षा मोहिमेअंतर्गत पाठ्य पुस्तक भांडार व वितरण केंद्र येथून वितरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. नाशिकमधील पंधरा तालुके आणि दोन महानगरपालिका तसेच धुळे जिल्ह्यातील चार तालुके एक महानगरपालिका, नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके आणि जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुके आणि एक महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. 
 नाशिक जिल्हा परिषदेने २८ लाख ६५ हजार ४२२, तर महापालिकेने सहा लाख ३७ हजार आठ पुस्तक प्रतींची मागणी नोंदविली आहे. वितरण केंद्रातून नाशिक जिल्हा परिषदेला ६९.५, तर नाशिक महापालिकेला ३१.९१ टक्के इतका पाठ्यपुस्तकांचा पुरवठा शुक्रवारअखेर करण्यात आला.
 नाशिक जिल्हा परिषदेला पुरवठा करण्यात येणाºया सुमारे २८ लाख पुस्तकांची किंमत अकरा कोटी ७३ लाख वीस हजार इतकी असून, महापालिकेला पुरविण्यात येणाºया पाठ्यपुस्तकांची किंमत दोन कोटी ६० लाख ४४ हजार इतकी आहे.   जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शुक्रवारअखेर १९ लाख ७८ हजार ४५९ पुस्तक प्रतींचा पुरवठा करण्यात आला असून अद्याप आठ लाख ८६ हजार ९६३ तर महापालिकेच्या शाळांसाठी दोन लाख ३ हजार २४२ पुस्तक प्रतींचा पुरवठा झाला आहे, तर चार लाख ३३ हजार ७६६ प्रतींचा पुरवठा शिल्लक आहे.

Web Title:  56 percent textbooks supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.