पोलीसपाटलांची ५६ पदे

By admin | Published: March 12, 2016 11:05 PM2016-03-12T23:05:10+5:302016-03-12T23:22:08+5:30

बागलाण : तहसील कार्यालयात आरक्षण सोडत

56 posts of police stations | पोलीसपाटलांची ५६ पदे

पोलीसपाटलांची ५६ पदे

Next

 सटाणा : बागलाण तालुक्यातील छपन्न गावातील रिक्त असलेल्या पोलीसपाटील पदांना नुकतीच सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी येत्या १४ मार्चला येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत ठेवण्यात आली आहे.
बागलाण तालुक्यातील अनेक गावांचे पोलीसपाटील पदे रिक्त होती. पोलीसपाटील म्हणजे पोलीस प्रशासन आणि गावकरी याच्यातला दुवा मानला जातो. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून तब्बल छपन्न गावांचे पोलीसपाटील पद रिक्त असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत होती. याबाबत प्रांताधिकारी संजय बागडे यांनी दखल पोलीसपाटलांच्या रिक्त पदाच्या मंजुरीसाठी विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सहाय्यक आयुक्तांनी नुकतीच या पदांना मंजुरी दिली आहे.
या भरतीप्रक्रि येसाठी तीस टक्के महिला व प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (दि. १४) रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत ठेवण्यात आली आहे.
या सोडत प्रसंगी संबंधित गावच्या इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी बागडे यांनी केले आहे.(वार्ताहर)

Web Title: 56 posts of police stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.