५६३ बाधित; ३२५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:50+5:302021-03-08T04:15:50+5:30
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.७) तब्बल ५६३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.७) तब्बल ५६३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून १ बळी गेला असल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१३४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक बाधित झाले असून, अशा प्रकारे होत असलेली सातत्यपूर्ण वाढ नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २५ हजार ८९५ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १९ हजार ८१५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ३,९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.१७ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.२६, नाशिक ग्रामीण ९५.८९, मालेगाव शहरात ८९.३६, तर जिल्हाबाह्य ९३.०६, असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ५८ हजार ९७१ असून, त्यातील चार लाख ३० हजार ५८४ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २५ हजार ८९५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,४९२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.