दिंडोरीत ५६५ रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 09:51 PM2021-04-04T21:51:04+5:302021-04-05T00:44:50+5:30
दिंडोरी : तालुक्यात ५६५ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. गेल्यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गावांत लॉक डाऊन पूर्वीच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता, मात्र यावेळी ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मातेरेवाडी येथे आठवड्याचा जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे.

दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत २५०५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून १८८३ रुग्ण बरे झाले असून ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी शहरात आजपावेतो ३६८ रुग्ण तर अन्य गावात २१३७ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या दिंडोरीत सर्वाधिक ७५ वणीत ६८ तर मातेरेवाडी त ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, मुख्याधिकारी नागेश येवले आदींसह सर्व प्रशासकीय अधिकारी कोरोना रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दिंडोरी, वणी, खेडगाव, मोहाडी, जानोरी हे गेल्यावेळीचे हॉटस्पॉट होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर कार्यवाही केली असून सायंकाळी ७ नंतर उघडे दुकाने तसेच शनिवार व रविवार पूर्ण बाजारपेठ बंद असताना दुकाने सुरु असणाऱ्या व्यावसायिक, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले आहे.
यावेळी मातेरेवाडी हे गाव हॉटस्पॉट बनले असून येथील ग्रामसेवक हेच पोजिटिव्ह आले व त्यांचे दुर्दैवाने निधन झाले मात्र तत्पूर्वी त्यांनी कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठक घेतल्या आपल्या कर्तव्यात तप्तर राहत कामकाज केले मात्र दुर्दैवाने त्यांनाच कोरोनाने अंत झाला.