नाशिक  जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:51 PM2018-08-11T17:51:26+5:302018-08-11T17:54:00+5:30

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वे स्थानकापासून जवळच भरधाव वेगाने जाणा-या रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडूरंग बिरार या शेतक-याने रेल्वेखाली आत्महत्या केली

57 farmers suicides in Nashik district | नाशिक  जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक  जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next
ठळक मुद्देनांदगावी रेल्वेखाली जीव : लागोपाठ घटनादरमहिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

नाशिक : निफाड तालुक्यातील उगाव येथे दोन दिवसांपुर्वी रेल्वेखाली शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी नांदगावी येथे मच्छिंद्र बोरसे या शेतक-यानेही रेल्वेखाली आपला जीव देवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लागोपाठच्या या घटनेने जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणा-या शेतकºयांची संख्या ५७ झाली आहे.
नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वे स्थानकापासून जवळच भरधाव वेगाने जाणा-या रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शिवारात उगावचे शेतकरी रामदास पांडूरंग बिरार या शेतक-याने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून, दरमहिन्याला सरासरी ७ शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. सध्या पिक पेरणीचा हंगाम असून, एकीकडे शेतकरी शेतीकामात व्यस्त असताना दुसरीकडे शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने शेतकºयांचे दिड लाख रूपयांचे कर्ज माफ केले तसेच आता शेतक-याच्या कुटंबातील व्यक्तींचेही दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला असताना शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत.

Web Title: 57 farmers suicides in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.