दहा लाख लोकसंख्येमागे ५७ हजार ३८२ चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 01:12 AM2020-08-21T01:12:07+5:302020-08-21T01:13:13+5:30

शहरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दर दहा लोक संख्येमागे ५७ हजार ३८२ नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी पुढील संसर्ग रोखण्यात यश येते. शहरात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून वीस दिवसांवर आला आहे.

57 thousand 382 tests for a population of one lakh | दहा लाख लोकसंख्येमागे ५७ हजार ३८२ चाचण्या

दहा लाख लोकसंख्येमागे ५७ हजार ३८२ चाचण्या

Next
ठळक मुद्देमिशन झिरो नाशिक : कोरोनामुक्तीचे प्रमाण ८६ टक्के

नाशिक : शहरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दर दहा लोक संख्येमागे ५७ हजार ३८२ नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी पुढील संसर्ग रोखण्यात यश येते. शहरात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून वीस दिवसांवर आला आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात नाशिक शहरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४१९ रुग्ण आढळले आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने बाधीतांची संख्या वाढत आहे. परंतु कोरोना नियंत्रणासाठी ते आवश्यक असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
शहरात कोरोनाबाधितांच्या चाचण्या वाढविल्या असल्या तरी चाचण्यांमध्ये बाधीत आढळण्याचे प्रमाण आता १८ टक्क्यांवर आले आहे, पूर्वी ते २५ टक्के होते. रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १८ ऐवजी वीस दिवसांवर गेले आहे. तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८६ टक्के झाले आहे.
शहरात सोळा हजार रुग्ण झाले बरे
शहरात ६ एप्रिलपासून आत्तापर्यंत १८ हजार ५९० रूग्ण आढळले आहेत. त्यातील १६ हजार ३५५ रूग्ण बरे झाले आहेत. तर १ हजार ८१६ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत.

Web Title: 57 thousand 382 tests for a population of one lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.