५७ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; बनावट चावीचा वापर
By admin | Published: March 9, 2017 08:51 PM2017-03-09T20:51:40+5:302017-03-09T20:51:40+5:30
बजरंगवाडी परिसरातील सताजी नगरमध्ये राहणारे ख्वाजा लाल शेख यांच्या बंद घराचे कुलुप बनावट चावीचा वापर करुन चोरट्यांनी उघडले.
नाशिक : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.८) शहरात मुंबईनाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या प्रत्येकी एक घर चोरट्यांनी फोडून सोने-चांदीचे दागिने लुटल्याचे उघडकीस आले आहे.
उन्हाळी सुटी सुरू होण्याआगोदरच बंद घरांवर चोरट्यांकडून वक्रदृष्टी करण्यात आली असून घरफोड्या करणाऱ्या टोळ्या शहरात सक्रीय झाल्याच्या विविध घटनांवरून स्पष्ट होत आहे. सातत्याने इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, गंगापूररोड आदि परिसरात घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बजरंगवाडी परिसरातील सताजी नगरमध्ये राहणारे ख्वाजा लाल शेख यांच्या बंद घराचे कुलुप बनावट चावीचा वापर करुन चोरट्यांनी उघडले. त्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करुन १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, तीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, तीस ग्रॅम वजनाचे कानातले आभुषणे, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाचे पाच हजार रुपये किमतीचे आभुषणे असा एकूण ५७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करीत आहेत.