५९ उमेदवार रिंगणात

By admin | Published: February 14, 2017 12:31 AM2017-02-14T00:31:38+5:302017-02-14T00:32:29+5:30

सिन्नर : देवपूर गटातून कॉँग्रेस, तर ठाणगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार

59 candidates in the fray | ५९ उमेदवार रिंगणात

५९ उमेदवार रिंगणात

Next

 सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. जिल्हा परिषदेच्या ४८ इच्छुकांपैकी तब्बत ३० जणांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. पंचायत समितीच्या ९२ इच्छुकांपैकी ५१ जणांनी माघार घेतल्याने १२ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. देवपूर गटातून कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार शोभा बाळासाहेब गोरडे, तर ठाणगाव गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार हौशाबाई मुरलीधर पवार यांनी माघार घेतल्याने आघाडीसाठी तो धक्का ठरला.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी केवळ चार तासांचा अवधी होता. माघारीसाठी आलेल्या सूचक किंवा उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश दिला जात होता. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोकरे, उपनिरीक्षक तृप्ती आठवडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर तैनात होता. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व मनसेचे पदाधिकारी निवडणूक कक्षाबाहेर ठाण मांडून होते. सर्वात शेवटी अखेरच्या क्षणी चास गटातून सीमा माणिकराव कोकाटे यांनी माघार घेतली.
माघारीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेले अर्ज पुढीलप्रमाणे.
नायगाव गट- कल्याणी सुदाम बोडके (भाजपा), मुक्ता चंद्रकांत बोडके (राष्ट्रवादी), सुनीता संजय सानप (शिवसेना). नायगाव गण- मोहन निवृत्ती कातकाडे (राष्ट्रवादी), संग्राम शिवाजी कातकाडे (शिवसेना), ज्ञानेश्वर बाबूराव कातकाडे (मनसे), विष्णू नवलसिंग पाबळे (अपक्ष), लक्ष्मण वामन सांगळे (भाजपा). माळेगाव गण- भगवान विठ्ठल पथवे (शिवसेना), शरद लक्ष्मण पवार (भाजपा), अर्जुन नाना बर्डे (राष्ट्रवादी).
मुसळगाव गट- सुनीता संतोष कदम (राष्ट्रवादी), मंगल सुरेश कुऱ्हाडे (भाजपा), वैशाली दीपक खुळे (शिवसेना). मुसळगाव गण- कुसुम अनिल जाधव (भाजपा), जयश्री अनिल पेढेकर (राष्ट्रवादी), सुमन राजाराम बर्डे (शिवसेना). गुळवंच गण- सुनीता वसंत अढांगळे (बसपा), अनिता छबू कांगणे (राष्ट्रवादी), रोहिणी समाधान कांगणे (शिवसेना), वर्षा हेमंत भाबड (भाजपा).
देवपूूर गट - सीमंतिनी माणिकराव कोकाटे (भाजपा), शीतल अशोक घुमरे (शिवसेना). देवपूर गण- विजय सूर्यभान गडाख (भाजपा), सीताराम गणपत गिते (शिवसेना), रावसाहेब गोरक्षनाथ थोरात (कॉँग्रेस). भरतपूर गण- योगिता बाबासाहेब कांदळकर (भाजपा), जयश्री मच्छिंद्र चिने (शिवसेना).
नांदूरशिंगोटे गट- नीलेश देवराम केदार (शिवसेना), नीलेश उत्तम जगताप (रासप), विलास चंद्रभान पगार (अपक्ष), बाळासाहेब नाना वाघ (राष्ट्रवादी), मंगेश लक्ष्मण शेळके (भाजपा). पांगरी बुद्रुक गण- विजय भीमराव काटे (अपक्ष), सुनील सखाराम काटे (रासप), रवींद्र विठ्ठल पगार (भाजपा), संपत कारभारी पगार (शिवसेना), विजय रामराव शिंदे (अपक्ष). नांदूरशिंगोटे गण- हिराबाई पांडुरंग आव्हाड (राष्ट्रवादी), योगिता अशोक केदार (भाजपा), शोभा दीपक बर्के (शिवसेना), राणी संचित शेळके (रासप).
चास गट- आशा शिवाजी गोसावी (मनसे), वैशाली रामदास जायभावे (भाजपा), शीतल उदय सांगळे (शिवसेना). चास गण- जगन्नाथ रंगनाथ भाबड (शिवसेना), राजेश बंडू भाबड (भाजपा). डुबेरे गण- नंदाबाई अजय कडाळे (मनसे), संगीता रामनाथ पावसे (शिवसेना), अंबिका संतू बिन्नर (भाजपा), सुवर्णा राजाराम वाजे (राष्ट्रवादी).
ठाणगाव गट- वनीता नामदेव शिंदे (शिवसेना), शीलाबाई प्रभाकर हारक (भाजपा). ठाणगाव गण- वेणूबाई
अशोक डावरे (शिवसेना), मंगला बाळासाहेब शिंदे (भाजपा). शिवडे गण- रावसाहेब म्हसूजी आढाव (शिवसेना),
तातू भागवत जगताप (भाजपा), सुरेश चंदर पवार (अपक्ष), सूर्योधन सुखदेव पवार (अपक्ष). (वार्ताहर)

Web Title: 59 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.