जिल्हा परिषदेत ५९२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची भरतीप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:14 PM2019-02-14T23:14:40+5:302019-02-15T00:24:56+5:30
आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असून, राज्यभरातून ५९२ पदे नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने रखडलेली भरतीप्रक्रिया सुरू करताना भरतीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्याला प्राधान्य दिल्यामुळे सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केला आहे.
नाशिक : आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असून, राज्यभरातून ५९२ पदे नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने रखडलेली भरतीप्रक्रिया सुरू करताना भरतीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्याला प्राधान्य दिल्यामुळे सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये ५९२ समुदाय आरोग्य अधिकारी पदाची थेट मुलाखत प्रक्रियेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने यापूर्वी भरतीप्रक्रि या राबविली होती, मात्र विविध तांत्रिक बाबींमुळे ही भरतीप्रक्रि या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रद्द करून नवीन भरतीबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते.
नोव्हेंबर महिन्यात ६० पदांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र उमेदवारांनी कोणत्या तालुक्यासाठी अर्ज सादर केले याचा उल्लेख केलेला नसल्याने तसेच रिक्त पद असलेला उमेदवार स्थानिक रहिवासी नसल्याने सदरचे उमेदवार गुणांकनानुसार पात्र असूनही त्याची निवड कशी व कोणत्या तालुक्यासाठी करावी याबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्याचबरोबर काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त विकल्प दिल्याने त्यांची प्राधान्यता निश्चित करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आरक्षण तालुक्यानुसार असल्यानेही संवर्गाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण होऊन इतर जिल्ह्णांतील उमेदवारांना गुणांकनानुसार कोणत्या तालुक्यात निवड द्यावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
तालुकावार आरक्षणामुळे व अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे निवड करताना सदरची प्रक्रि या क्लिष्ट असल्याने तसेच उमेदवारांना निवड प्रक्रि येचे पूर्णत: ज्ञान नसल्याने भरतीबाबत संभाव्य तक्र ारी उद्भवण्याची शक्यता असल्याने सदरची भरतीप्रक्रि या रद्द करण्याची विनंती करतानाच नवीन पद भरती करताना शासन निर्णयानुसार जिल्हा स्तरावरून आरक्षण देण्यात यावे, उमेदवारांची निवड गुणानुक्रमे करण्यात यावी, उमेदवारांचे अर्ज तालुका पसंतीनुसार न मागता एकत्रित मागवून गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार निवड करून समुपदेशन पद्धतीने पद स्थापना द्यावी, अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या.
नवीन जाहिरातीनुसार जिल्हास्तरावर समुपदेशनाने सदरची पदे भरण्यात येणार असून, यासाठी उमेदवारांना गुणानुक्र मानुसार व आरक्षणनिहाय बोलावून त्यांना त्यांच्या स्थानिक तालुक्यातील पसंतीचे ठिकाण निवडून उमेदवाराने दिलेल्या विकल्पाप्रमाणे प्रशिक्षणार्थी नियुक्ती आदेश द्यावयाचे आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असणार असून, या कालावधीत उमेदवारांना विद्यावेतन देण्यात येणार आहे.
येत्या ५ मार्चपर्यंत सदरची भरतीप्रक्रि या पूर्ण करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून प्रशिक्षण आदेश द्यावयाचे आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी हे सदस्य आहेत.
निकषांनुसारच भरतीप्रक्रि या : डॉ. नरेश गिते
उमेदवारांची निवड ही शासनाच्या निकषानुसारच होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निवड प्रक्रि येत सहभागी व्हावे. भरतीबाबत कुणीही प्रलोभन दाखविल्यास आपल्याकडे लेखी तक्र ार करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.