शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:32 AM2018-03-06T01:32:59+5:302018-03-06T01:32:59+5:30
विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी जाहीर केले आहे. शहरातील विविध भागांत यासाठी ८३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याने त्याआधारेच दाखले अदा केले जाणार आहेत.
नाशिक : विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी जाहीर केले आहे. शहरातील विविध भागांत यासाठी ८३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याने त्याआधारेच दाखले अदा केले जाणार आहेत. सेतू कार्यालयाबाबत केल्या जाणाºया तक्रारी, भ्रष्टाचार व पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. दरवर्षी मे ते जुलै या तीन महिन्यांत शासकीय दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत असल्याने त्याचाच गैरफायदा सेतु केंद्राकडून व मध्यस्थ दलांलाकडून उचलला जात असल्याने ते टाळण्यासाठी थेट आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून किंवा नागरी सेवा केंद्रे, महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांनी दाखल्यांसाठी आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. ज्या नागरिकांकडे संगणक व इंटरनेटची सुविधा आहे ते आपल्या घरातूनच अर्ज करू शकतात. या अर्जासोबत आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास त्याच्या माध्यमातून दाखल्याचा प्रवासही कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दाखला तयार झाल्यास त्याची सॉप्ट कॉपी घरात बसून मिळणार आहे. कोणत्याही सायबर कॅफेमधूनदेखील आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. सेवा हमी कायद्यान्वये जितके दिवस दाखल्यांसाठी निश्चित करण्यात आले त्या वेळेतच दाखले दिले जातील असे सांगून दर दहा हजार लोकसंख्येमागे एक सेवा केंद्र नव्याने सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात नागरिकांची गरज लक्षात घेऊन नवीन केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.
जुने दाखले मिळणार
शहरातील सेतू कार्यालयात यापूर्वी शासकीय दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना त्यांचे दाखले देण्यात येणार आहेत. मात्र यापुढे सेतू कार्यालयात कोणाचेही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे ज्यांचे अर्ज आहेत व दाखले तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहेत, त्यांच्यासाठी काही दिवस सेतू कार्यालय सुरू राहणार आहे. अशा दाखल्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.