पक्ष्यांची शिकार करणारे ६ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 01:21 AM2021-09-18T01:21:19+5:302021-09-18T01:21:46+5:30

पक्ष्यांची शिकार करत वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी ६ संशयितांना वनविभागाने अटक केली असून, या संशयितांना येवला न्यायालयाने सोमवार दि.२० सप्टेंबरपर्यंत वनकोठडी दिली आहे.

6 bird hunters arrested | पक्ष्यांची शिकार करणारे ६ जण अटकेत

पक्ष्यांची शिकार करणारे ६ जण अटकेत

Next
ठळक मुद्देयेवला : न्यायालयाकडून सोमवारपर्यंत वनकोठडी

येवला : पक्ष्यांची शिकार करत वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी ६ संशयितांना वनविभागाने अटक केली असून, या संशयितांना येवला न्यायालयाने सोमवार दि.२० सप्टेंबरपर्यंत वनकोठडी दिली आहे.

शुक्रवारी (दि.१७) मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनविभागाचे राजापूर फिरस्ती पथक मौजे डोंगरगाव, ता. येवला येथे गट नं. ३०२ मध्ये फिरस्ती करत असताना संशयित पुंडलिक सुखराम वाघ (वय १९, रा. पाथर्डी, ता. सुरगाणा), मधुकर मांगू वासले (वय ३०, रा. पाथर्डी, ता. सुरगाणा), देवेंद्र मधुकर वासले (वय १८, रा. पाथर्डी, ता. सुरगाणा), रामदास गोविंदा वासले (वय ३५, रा. पाथर्डी, ता. सुरगाणा), किसन पांडू गांगोडे (वय ३०, रा. पंगाळबारे, ता. सुरगाणा), रामजी पांडू पवार (वय ४५, रा. पाथर्डी, ता. सुरगाणा, जि. नाशिक) संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडील पिशवीमध्ये व्हलगे १२ नग (मृत), चंडोल ४ नग (मृत), बुलबुल १ नग (मृत), तसेच गलोर २ नग आढळून आले.

आढळून आलेले सर्व पक्षी हे भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या अनुसूची ४ मधील असल्याने या संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमच्या तरतुदींचा भंग झाल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सर्व संशयितांना शुक्रवारी, (दि.१७) येवला न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना सोमवार, (दि.२०) पर्यंत वनकोठडी सुनाविण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, उपवनसंरक्षक पूर्व भाग तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक मनमाड डॉ. सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला अक्षय म्हेत्रे, वनपाल एम.बी. पवार, वनरक्षक पी.एस. पाटील, वनरक्षक जी.आर. हरगावकर, वनरक्षक गोपाल राठोड, वनरक्षक पंकज नागपुरे, वनरक्षक नवनाथ बिन्नर, वनकर्मचारी सुनील भुरुक, निखिल आरणे, कांतीलाल गायकवाड आदी करत आहेत.

फोटो- १७ येवला बर्ड

Web Title: 6 bird hunters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.