समग्र शिक्षाअंतर्गत ७ कोटी ८३ लाख अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:28 PM2019-12-13T23:28:15+5:302019-12-14T00:47:11+5:30

सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ३५८ शाळांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे ७ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

6 crore 2 lakh subsidy under the overall education | समग्र शिक्षाअंतर्गत ७ कोटी ८३ लाख अनुदान

समग्र शिक्षाअंतर्गत ७ कोटी ८३ लाख अनुदान

Next
ठळक मुद्दे३३५८ शाळांचा समावेश : ६० पेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांचा फायदा

नामदेव भोर। लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ३५८ शाळांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे ७ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून पटसंख्येच्या प्रमाणात अनुदान वितरित करण्यात आल्याने ३० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना फटका बसला असला तरी अधिक पटसंख्येच्या शाळांना मात्र समग्र शिक्षाअंतर्गत अधिक अनुदान प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून अस्तित्वात आणलेल्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत शाळांवरील खर्च, अनुदानाचे वितरण यावर्षी पटसंख्येनुसार करण्यात आले आहे. यात तीसपेक्षा कमी पट असलेल्या राज्यातील शाळांना अवघे पाच हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी शंभरपेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी साधारण दहा हजार रुपये अनुदान मिळत होते. आता शंभरपेक्षा कमी पटाच्या शाळांमध्येही आणखी वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार तीसपर्यंतच्या पटसंख्येच्या शाळांना पाच हजार रुपये, ३१ ते ६० पटसंख्येसाठी दहा हजार रुपये, ६१ ते १०० पटसंख्येसाठी २५ हजार रुपये, १०१ ते २५० पटसंख्येसाठी ५० हजार रुपये, २५१ ते १००० पटसंख्येसाठी ७५ हजार रुपये आणि एक हजारपेक्षा अधिक पटाच्या शाळांसाठी एक लाख रुपये संयुक्त शाळा अनुदान मिळणार आहे. यात साधारणपणे ६१ ते १०० आणि त्याहून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना वाढीव अनुदान मिळणार असून, जिल्हास्तरावरून एकूण ७ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप नोव्हेंबरअखेपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान मिळालेल्या शाळांना त्याचा फायदा होणार आहे.
तालुकानिहाय अनुदानाचे वाटप
तालुका अनुदानाची रक्कम (रुपयांमध्ये)
४ बागलाण ६१ लाख ८५ हजार
४ चांदवड ४४ लाख २५ हजार
४ देवळा २६ लाख १५ हजार
४ दिंडोरी ६६ लाख ९० हजार
४ इगतपुरी ५९ लाख १० हजार
४ कळवण ४१ लाख
४ मालेगाव ८३ लाख ४५ हजार

तालुका अनुदानाची रक्कम (रुपयांमध्ये)
४ नांदगाव ५२ लाख २० हजार
४ नाशिक ३८ लाख १५ हजार
४ निफाड ७२ लाख २५ हजार
४ पेठ ३७ लाख ०५ हजार
४ सिन्नर ५३ लाख ८५ हजार
४ सुरगाणा ४९ लाख ७५ हजार
४ त्र्यंबक ४३ लाख २० हजार
४ येवला ५४ लाख २५ हजार

Web Title: 6 crore 2 lakh subsidy under the overall education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.