वीजचोरीप्रकरणी सहा लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:30 AM2019-08-08T00:30:22+5:302019-08-08T00:31:06+5:30

वणी : विशेष पथकाकडून कारवाईवणी : वीजचोरीप्रकरणी वीज महावितरण मंडळाच्या विशेष पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत एकूण सहा लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

 6 lakh penalty for electricity theft | वीजचोरीप्रकरणी सहा लाखांचा दंड

वीजचोरीप्रकरणी सहा लाखांचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्देवीजचोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महामंडळाने विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

वणी : विशेष पथकाकडून कारवाईवणी : वीजचोरीप्रकरणी वीज महावितरण मंडळाच्या विशेष पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत एकूण सहा लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
वणी तालुक्यात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ होत असून, अशा वीजचोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महामंडळाने विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पार्श्वभूमीवर पथकाकडून अचानक वणी-कळवण रस्त्यावरील एका हॉटेलच्या मीटरची तपासणी करण्यात आली. प्रथमदर्शनी मीटरमध्ये फेरफार केल्याचा संशय आल्याने पथकातील अधिकाऱ्यांनी सदरचे वीजमीटर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पुढे वणी-पिंपळगाव रस्त्यावरील एका किराणा दुकानातील दोन व्यावसायिक मीटरची तपासणी केली या दोन्ही मीटरमध्येही फेरफार केल्याची बाब पुढे आली. त्यानंतर एका पानटपरीत अशाच पद्धतीने वीजचोरी केली गेल्याचे निदर्शनास आल्याने सदरचे चारही मीटर वितरण कंपनीच्या कार्यालयात तपासणीसाठी आणण्यात आले. मीटरच्या तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. हॉटेल चालकाने २० हजार ९१७ युनिटची वीजचोरी केल्यामुळे ४ लाख ८ हजार ५३० रु पये, किराणा दुकानदाराने ६ हजार ७९ युनिटची वीजचोरी म्हणून १ लाख २ हजार ८०० रु पये, याच दुकानदाराच्या दुसºया मीटरमधून ५ हजार २०३ युनिटची चोरी केल्याने ७७ हजार २७० रु पयांचा दंड ठोठावण्यात आला. तर पानटपरी मालकावर १३ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता आर. एम. पाटील यांनी दिली. विद्युत वितरण कंपनीच्या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

Web Title:  6 lakh penalty for electricity theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.