तांत्रिक बिघाडामुळे बदलले २४२ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:37 AM2019-10-22T01:37:34+5:302019-10-22T01:39:38+5:30

जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे.

 6 machines replaced by technical breakdown | तांत्रिक बिघाडामुळे बदलले २४२ मशीन

तांत्रिक बिघाडामुळे बदलले २४२ मशीन

Next

नाशिक : जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे. लासलगावसह इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, नांदगाव तालुक्यातील आमोदे येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काहीवेळ प्रक्रिया थांबली होती.
नाशिक जिल्ह्यात पंधरा मतदारसंघात एकूण आठ हजार ५७८ ईव्हीएम मशीनची व्यवस्था आहे. त्यात दहा टक्के ईव्हीएम जादा ठेवण्यात आली होती. कोठे यंत्रात बिघाड झाला तर विनाविलंब बदलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक शाखेने तत्काळ कार्यवाही केल्याने मतदारांची गैरसोय झाली नाही.
नाशिक शहरात मतदानाला सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना अनेक ठिकाणी मतदान केंद्रातील ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडल्या. नाशिक मध्य मतदारसंघात अटलबिहारी वाजपेयी मनपा शाळेत सकाळीच मतदार रांगेत असतानाच ईव्हीएम बंद पडल्याने खोळंबा झाला. काही वेळाने ते सुरू झाले. नाशिक पूर्व मतदारसंघात पंचवटीतील फुलेनगर येथील मनपा शाळेत बॅटरी खराब झाल्याने ईव्हीएम बंद पडले. त्यानंतर काही वेळाने ते सुरळीत
झाले. पंचवटीतीच मखमलाबाद नाका येथील उदय कॉलनी येथे एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम बंद पडले. तपासणी केल्यानंतर बॅटरीत बिघाड झाले असल्याचे निदर्शनास आले. बॅटरी बदलल्यानंतर ते सुरळीत झाले.
पंचवटीत धामणकर महाविद्यालयात बुथ क्रमांक १८ मध्येही सकाळी ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ झाला होता. मात्र नंतर दहा मिनीटांनी मतदान सुरू झाले. नाशिक पश्चिम मतदारसंघातील कामटवाडे येथील विखे पाटील शाळेत मतदान केंद्र क्रमांक ३१६ मध्ये सकाळी आठ वाजता ईव्हीएम बंद पडले. त्यानंतर ते बदलण्यात आले त्यामुळे दहा मिनिटांनी मतदान सुरळीत झाले. त्यानंतर त्याच्या शेजारीत केंद्र क्रमांक ३१७ मध्येदेखील ईव्हीएम बंद पडले. परंतु पर्यायी यंत्र नसल्याने ते मागविण्यात आले. त्यामुळे जवळजवळ पाऊण तासांनी मतदान सुरू झाले.

Web Title:  6 machines replaced by technical breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.