निमा निवडणुकीत ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:43 AM2018-07-30T00:43:33+5:302018-07-30T00:43:47+5:30

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. २९६५ पैकी १७९२ मतदरांनी मतदानाच हक्क बजावला. सोमवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

60 percent voting in NIMA elections | निमा निवडणुकीत ६० टक्के मतदान

निमा निवडणुकीत ६० टक्के मतदान

Next

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. २९६५ पैकी १७९२ मतदरांनी मतदानाच हक्क बजावला. सोमवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.  रविवारी सकाळी निमा कार्यालयात मतदानप्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदार रांगेत असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदानप्रक्रि या पार पडली. मतदानासाठी १५ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. उमेदवारांची संख्या पाहता नावे शोधून देण्यात मतदारांना देण्यासाठी वेळ लागत असल्याने मतदान केंद्राची संख्या वाढवत ही संख्या २८ पर्यंत नेण्यात आली. तत्पूर्वी मतदार रांगेत उभे राहूनही मतदानासाठी वेळ लागल्याने अनेक मतदार मतदान न करताच माघारी फिरले. दुपारपासून साधारणपणे दर तासाला २०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  सिन्नरसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. २९६५ मतदारांपैकी १७९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ६०.४० टक्के मतदान झाले. सिन्नरच्या ६५० पैकी ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी दि.३० रोजी सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी प्रक्रि येस प्रारंभ होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतांनी, विवेक गोगटे, एन. टी. अहिरे यांनी काम पाहत आहेत.
निमाच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनेलमध्ये फूट पडल्याने एकता पॅनल दोन गटांत विभागले गेले आहे. यात निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल, आणि किशोर राठी-आशिष नहार यांचेही एकता पॅनल यांच्या विरोधात उद्योग विकास पॅनल असे तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. निमाच्या इतिहासात प्रथमच तीन पॅनेलमध्ये ही निवडणूक झाली.
मतदान कक्षात निमाचे माजी अध्यक्ष, निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य रेंगाळत असल्याचे पाहून उद्योग विकास पॅनलचे उमेदवार प्रदीप पेशकार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला. ते माजी अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असल्याने तसेच ते मदत करीत असल्याचे निवडणूक अधिकारी व्ही. के. भुतांनी, विवेक गोगटे यांनी सांगून पेशकार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पेशकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर निवडणूक अधिकाºयांनी सर्वांना मतदान केंद्रातून बाहेर काढले.

 

Web Title: 60 percent voting in NIMA elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.