जिल्ह्यातील ६० टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’ प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:03 AM2020-07-04T00:03:54+5:302020-07-04T00:47:51+5:30

यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे.

60% students in the district are in digital stream | जिल्ह्यातील ६० टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’ प्रवाहात

जिल्ह्यातील ६० टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’ प्रवाहात

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या संकटावर मात : शिक्षण संस्थांकडून आॅॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम; वर्गांसाठी वेळेचे नियोजन

नाशिक : यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेसह क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक एज्युकेशन सोसायटी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. या माध्यमातून इयत्ता तिसरी ते दहावी व बारावीच्या वर्गांसाठी वेळेचे नियोजन करून ठराविक तासिकांच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षणातही आॅनलाइन अध्यापनास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, मोबाइल, इंटरनेटअभावी अथवा अन्य समस्यांमुळे आॅनलाइन तासिकेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कमी वेळाचे वेगवेगळे व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे.

Web Title: 60% students in the district are in digital stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.