पीएम केअर फंडातील ६० व्हेंटिलेटर खराब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 01:15 AM2021-06-14T01:15:29+5:302021-06-14T01:16:59+5:30

पीएम केअर फंडातून मिळालेल्या ६० व्हेंटिलेटरसाठी पूरक साहित्य नसल्याने त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेेला संंबंधित कंपनीच्या अभियंत्याने येऊन ते सध्या प्रचलित सेन्सर आणि स्टँडवरून सुरू करून दाखवले हेाते. त्यानंतर महापालिकेने त्यातील तीस व्हेंटिलेटर मविप्रच्या डॉ. वसंत पवार रुग्णालयाला देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता हे व्हेंटिलेटर कार्यान्वित होऊ शकत नसल्याने परत पाठवण्याची तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

60 ventilators in PM care fund bad? | पीएम केअर फंडातील ६० व्हेंटिलेटर खराब?

पीएम केअर फंडातील ६० व्हेंटिलेटर खराब?

Next

नाशिक- पीएम केअर फंडातून मिळालेल्या ६० व्हेंटिलेटरसाठी पूरक साहित्य नसल्याने त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेेला संंबंधित कंपनीच्या अभियंत्याने येऊन ते सध्या प्रचलित सेन्सर आणि स्टँडवरून सुरू करून दाखवले हेाते. त्यानंतर महापालिकेने त्यातील तीस व्हेंटिलेटर मविप्रच्या डॉ. वसंत पवार रुग्णालयाला देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता हे व्हेंटिलेटर कार्यान्वित होऊ शकत नसल्याने परत पाठवण्याची तयारी करण्यात आली असल्याचे सांगितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. कोरोना संसर्गकाळात महापालिकेला मदत म्हणून पीएम केअर फंडातून २० एप्रिल रोजी ६० व्हेंटिलेटर पाठवण्यात आले होते. मात्र, त्यासोबत सेन्सर, स्टँडसह अन्य साहित्य नसल्याने ते उपयोगात येत नव्हते. कंपनीचे तंत्रज्ञ देखील नंतरच्या काळात न आल्याने अडचण झाली होती. त्यासंदर्भात महापालिकेने नोएडा येथील संबंधित पुरवठादार कंपनीशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्टँड आणि अन्य पूरक साहित्य पुरवण्याची जबाबदारी आपली जबाबदारी नाहीच, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे महापालिकेचे कोविड सेल प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी कंपनीकडे केंद्र शासनाने नक्की काय वर्क ऑर्डर दिली, त्याची प्रत मागितली हाेती. त्यानंतर कंपनीचे तंत्रज्ञ नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी झाकीर हुसेन रुग्णालयात १७ पैकी १४ व्हेंटिलेटर नव्याने बसवून ते कार्यान्वित असल्याचे दाखवले होते. दुसऱ्या दिवशी बिटको रुग्णालयात देखील त्याचे प्रात्यक्षिक झाले होते. दरम्यान, आता महापालिकेने हे व्हेंटिलेटर कार्यान्वित होत नसल्याने ते परत पाठवण्याची तयारी केली असून, तसे सूतोवाच आयुक्तांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इन्फो... व्हेंटिलेटर गरजेची नाहीत...? कोराेनाकाळात व्हेंटिलेटर बेडसाठी नागरिकांना धावपळ करावी लागली होती. मार्च- एप्रिल महिन्यात व्हेंटिलेटर बेड मिळणे हीा दुर्मिळातील दुर्मीळ प्रकार होता. मात्र, त्यानंतर आता फुकटात मिळालेल्या बेडसाठी केवळ सेन्सर आणि स्टँड नाही म्हणून ते परत पाठवण्याची तयारी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेने ठरवले तर पूरक आवश्यक साहित्य खरेदी करता येऊ शकते. परंतु ती टाळून व्हेंटिलेटरच परत पाठवण्याचा निर्णय अनाकलनीय ठरला आहे.

Web Title: 60 ventilators in PM care fund bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.