विभागातील ६०० चालक-वाहकांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:58 PM2020-07-18T17:58:38+5:302020-07-18T18:01:42+5:30

कोरोनाच्या प्रभावामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्याने महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरतीप्रक्रियेतून महामंडळात रुजू झालेल्या चालक-वाहकांच्या सेवांना तूर्तास स्थगिती दिली आहे. नाशिक विभागात कार्यरत असलेल्या सुमारे ६०० चालक-वाहकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. दरम्यान, जे उमेदवार सध्या प्रशिक्षण घेत आहेत त्यांचे प्रशिक्षणदेखील थांबविण्यात आले आहे.

600 drivers in the department will be hit | विभागातील ६०० चालक-वाहकांना बसणार फटका

विभागातील ६०० चालक-वाहकांना बसणार फटका

Next
ठळक मुद्देएसटीचा निर्णय सरळसेवा भरतीतील कर्मचाऱ्यांना स्थगिती

नाशिक: कोरोनाच्या प्रभावामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्याने महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरतीप्रक्रियेतून महामंडळात रुजू झालेल्या चालक-वाहकांच्या सेवांना तूर्तास स्थगिती दिली आहे. नाशिक विभागात कार्यरत असलेल्या सुमारे ६०० चालक-वाहकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. दरम्यान, जे उमेदवार सध्या प्रशिक्षण घेत आहेत त्यांचे प्रशिक्षणदेखील थांबविण्यात आले आहे.
राज्यातील प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचा-यांना पुढील महिन्याचे वेतन कसे अदा करावे? असा प्रश्न महामंडळापुढे आहे. कोरोनाचे संकट लागलीच कमी होण्याची चिन्हे नसल्याने आर्थिक उत्पन्नाचे स्रोत तसेच बचतीसाठी महामंडळाने पर्यायांचा विचार सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २००९ मध्ये सरळ सेवेतून भरती झालेल्या चालक-वाहकांच्या सेवेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सुमारे १३ हजार, तर नाशिक विभागात सुमारे ६०० कर्मचाºयांच्या सेवा यामुळे थांबविण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पननाचे स्त्रोतच बंद झाले आहेत. सामान्य जनजीवन सुरळीत होऊन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईपर्यंत बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हांतर्गत बसेस सुरू आहेत, तर काही मालवाहू ट्रकची सेवा पुरविली जात आहे. त्यातुलनेत अनेक कर्मचारी उपलब्ध आहेत. सदर परिस्थितीचा विचार करून महामंडळाने सरळ सेवा भरतीतील कर्मचा-यांची सेवा खंडित केली आहे.
कर्मचा-यांची केवळ सेवा खंडित करण्यात आली असून, त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलेले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. परिवहन सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सुरू होणा-या बसेसच्या संख्येनुसार संबंधित कर्मचा-यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतले जाणार आहे.

Web Title: 600 drivers in the department will be hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.