नाशिकमधील महापालिका पोटनिवडणुकीसाठी ६१ मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:26 PM2018-02-27T15:26:01+5:302018-02-27T15:26:01+5:30

प्रभाग १३ : मतदार यादीसंबंधी एकही हरकत नाही

 61 polling stations for Nashik Municipal Corporation by-election | नाशिकमधील महापालिका पोटनिवडणुकीसाठी ६१ मतदान केंद्र

नाशिकमधील महापालिका पोटनिवडणुकीसाठी ६१ मतदान केंद्र

Next
ठळक मुद्देयेत्या ८ मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहेपोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून त्यात २४ हजार १४० पुरूष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत

नाशिक - प्रभाग क्रमांक १३ (क) मध्ये रिक्त झालेल्या जागेवर एप्रिलमध्ये पोटनिवडणूक होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेने ६१ मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर एकही हरकत आली नाही. त्यामुळे, येत्या ८ मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे पोटनिवडणूक दि. ८ ते २२ एप्रिल या कालावधीत कधीही घेतली जाण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील मनसेच्या नगरसेवक सौ. सुरेखा भोसले यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी एप्रिलमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. निवडणूक शाखेने प्रारुप मतदार यादी तयार करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. परंतु, मुदतीत एकही हरकत दाखल झालेली नाही. त्यामुळे मतदार यादी घोषित करण्यात आली. त्यापाठोपाठ मंगळवारी (दि.२६) निवडणूक शाखेने ६१ मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली असून ती महापालिकेच्या संकेतस्थळासह पश्चिम विभागीय कार्यालयातही लावण्यात आलेली आहे. दि. ८ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे दि. ८ ते २२ एप्रिल या कालावधीत कधीही पोटनिवडणुकीसाठी मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून त्यात २४ हजार १४० पुरूष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. पोटनिवडणूक महिनाभरावर येऊन ठेपल्याने इच्छुकांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. मनसेबरोबरच शिवसेना-भाजपाकडूनही पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जाण्याची शक्यता असून कॉँग्रेस-राष्टवादीने उमेदवार न देण्याची भूमिका जाहीर केली असली तरी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  61 polling stations for Nashik Municipal Corporation by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.