नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 07:33 PM2020-06-28T19:33:08+5:302020-06-28T19:35:52+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
नाशिक : जिल्ह्यात निसर्ग चक्रिवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्हयात झालेला मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीची कामे वेग मिळाल्याने जिल्ह्यातील बहूतांशी शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरण्यांचे काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना महाबीज व एनएससी च्या बियाण्यांऐवजी खासगी कंपन्यांच्या बियांण्यांना अधिक पसंती दिली असून यात प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, मका , सारख्या पिकांचा समावेश आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांच्या बियाण्यांकडे वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात शेती क्षेत्रातही विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांची दर्जेदार बियाणे बाजारात आणल्याने अशा बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकरी बियाणे खरेदी करताना खास करून उगवण क्षमता केंद्रस्थानि ठेवत असला तरी अनेकदा अपुरा ओलाव व वातावरणाती बदल यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावताना दिसते. यावषी मान्सूनपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडला त्यानंतर दोन चार दिवसांतच मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असल्याचे शेती तज्ज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना पसंती दिली असल्याचे दिसून येत असून, ज्वारीची सर्वसाधारणपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.