महिलांमध्ये गर्भाशय, स्तन कॅन्सरचे प्रमाण ६२ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:20 AM2021-02-26T04:20:34+5:302021-02-26T04:20:34+5:30

नाशिक : देशात कॅन्सरचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना विशेषत्वे महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीला पोहोचू लागले ...

62% of women have uterine and breast cancer! | महिलांमध्ये गर्भाशय, स्तन कॅन्सरचे प्रमाण ६२ टक्के !

महिलांमध्ये गर्भाशय, स्तन कॅन्सरचे प्रमाण ६२ टक्के !

googlenewsNext

नाशिक : देशात कॅन्सरचा प्रसार अत्यंत वेगाने होत असताना विशेषत्वे महिलांमध्येदेखील कॅन्सरचे प्रमाण हे पुरुषांच्या बरोबरीला पोहोचू लागले आहे. देशातील १०० कॅन्सरबाधित महिलांपैकी ६२ टक्के प्रमाण हे स्तन कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सरचे असून हे दोन्ही कॅन्सर लवकर लक्षात आल्यास ते बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के असू शकते. मात्र, या संभाव्य आजारांबाबत चर्चा करतानाही महिला खुलेपणाने कुटुंबियांनाही सांगत नसल्याने महिलांमधील कॅन्सर आणि त्यामुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

देशातील बहुतांश महिला कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देताना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच लक्षणे समजत असूनही तपासणी केली जाण्याचे टाळले जाते. त्यामुळेच महिलांना होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी ३२ टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सर तर ३० टक्के महिलांना गर्भाशय कॅन्सर निष्पन्न होत असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. जननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत महिला खुलेपणाने पतीशीदेखील बोलत नाहीत, त्यामुळे त्या कॅन्सरला आळा घालण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर अर्थात पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होण्याची शक्यता १०० टक्के असते. आपल्याला स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो, अशी भीती एक तृतीयांश महिलांना वाटते, मात्र त्याबाबत चाचणी करण्यात होणारी टाळाटाळच घातकी ठरत असल्याने महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चाचण्यांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

इन्फो

डॉ. आनंदीबाई स्मरणार्थ महिला आरोग्य दिन

१८६५ मध्ये जन्मलेल्या आनंदी यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला होता. त्याकाळी विदेशात जाऊन आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील आणि भारतातीलही पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. डॉ.आनंदीबाई जोशी यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे, म्हणून भारतात दरवर्षी २६ फेब्रुवारी या त्यांच्या स्मृतीदिनाला राष्ट्रीय महिला आरोग्य दिन पाळला जाताे.

कोट

महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांची वेळीच चाचणी करुन घेतल्यास कॅन्सरग्रस्त महिला पूर्ण बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के होऊ शकते. त्यामुळेच संबंधित अवयवांमधील थोडाही बदल लक्षात आल्यास महिलांनी त्यांच्या चाचण्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

डॉ. राज नगरकर, कॅन्सर तज्ज्ञ

लोगो

महिला आरोग्य दिन विशेष

फोट

२५कॅन्सर

Web Title: 62% of women have uterine and breast cancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.