६३ कर्तृत्ववान महिलांचा ‘लाडली’ पुरस्काराने सन्मान
By admin | Published: March 6, 2017 01:34 AM2017-03-06T01:34:10+5:302017-03-06T01:34:23+5:30
नाशिक : मुलीची गर्भातच हत्त्या केली जात असून, अशा वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल सोनाली पवार यांनी केले़
नाशिक : पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अजूनही काही डॉक्टरांकडून गर्भलिंग चाचणी सुरू आहे़ वैद्यकीय तंत्रज्ञानाचा चुकीचा उपयोग करून मुलीची गर्भातच हत्त्या केली जात असून, अशा वैद्यकीय व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मुलींच्या प्रमाणात प्रचंड घट होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, असे प्रतिपादन मिसेस इंटरनॅशनल सोनाली पवार यांनी केले़ गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाडली पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या़
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महावीर इंटरनॅशनल, नाशिक व आॅल इंडिया श्वेतांबरी स्थानक जैन कॉन्फरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि़५) विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या समाजातील ६४ कर्तृत्ववान महिलांचा पवार यांच्या हस्ते लाडली पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़
यावेळी बोलताना पवार म्हणाल्या की, नाशिक , ओझर येथे गर्भलिंग चाचणी केली जात असल्याचे नुकतचे समोर आले आहे़ अशाच प्रकारे जर मुलींची हत्त्या होत राहिली तर कुळाला कुलदीपक, बहीण, बायको, पत्नी कुठून मिळणाऱ
यावेळी महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, भारत गंग, प्रफुल्ल सुराणा, दिलीप पारख, प्रचारमंत्री लोकेश पारख आदिंसह समाजातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता बाफणा यांनी, तर सूत्रसंचालन रूपाली चोरडिया यांनी केले़ (प्रतिनिधी)