‘त्या’ जमिनीचा ६३ लाखांना फेरलिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:00 AM2018-09-21T00:00:06+5:302018-09-21T00:00:29+5:30
मालेगाव : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे ७७७ शेतकऱ्यांचे २ कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपये थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली होती. या जप्त केलेल्या मालमत्तेचा बुधवारी फेरलिलाव घेण्यात आला. पावणेचार एकर क्षेत्र मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ४८ लाखांना तर ३० आर क्षेत्र श्रावण सूर्यवंशी यांनी १५ लाखांना लिलावात बोली लावून घेतले आहे. या लिलावातून मिळणारे ६३ लाख रुपये कांदा विक्रेत्या शेतकºयांना अदा केले जाणार आहेत.

मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील जय भोलेनाथ टेंडर्सचे व्यापारी सूर्यवंशी यांनी तालुक्यातील शेतकºयांकडून कांदा खरेदी केला होता. खरेदी केलेल्या कांद्यापोटी शेतकºयांना धनादेश दिले होते; मात्र धनादेश वटले नसल्यामुळे शेतकºयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. १३ आॅगस्टला लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या लिलावात केवळ कारचा लिलाव झाला होता. त्यामुळे जमिनीचा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दालनात फेरलिलाव करण्यात आला. गट क्रमांक ९१/१ व ९१/२ यांचे दुय्यम निबंधकांनी मूल्यांकन १८ लाख रुपये काढले होते. या लिलावात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे व पदाधिकाºयांनी सहभाग घेत ४८ लाखाला ही जमीन घेतली, तर सूर्यवंशी यांचे राहते घर वगळून उर्वरित ३० आर क्षेत्राचे मूल्यांकन ७९ हजार काढण्यात आले होते. श्रावण विक्रम सूर्यवंशी यांनी १५ लाख रुपयांना ३० आर क्षेत्र घेतले आहे. या लिलावातून ६३ लाख रुपये मिळणार आहेत. पंधरा दिवसांत पैसे जमा करावे लागणार आहेत. ही जमा झालेली रक्कम फसवणूक झालेल्या शेतकºयांना अदा केली जाणार आहे. यावेळी शांताराम लाठर, काशीनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
तहसीलदार देवरे यांच्या दालनात शिवाजी सूर्यवंशी यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू असताना दालनाबाहेर सूर्यवंशी यांच्या पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांना अश्रू अनावर झाले होते. जमिनीचा लिलाव होत असल्यामुळे त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता.