महापालिका हद्दीत ६३७१ अपंग सर्वेक्षण पूर्ण : १९३९ जणांकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:19 AM2017-09-01T01:19:41+5:302017-09-01T01:19:48+5:30
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींची संख्या असली तरी १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. महापालिकेने आता येत्या १० सप्टेंबरपासून या अपंग व्यक्तींसाठी विभागनिहाय वैद्यकीय तपासणी शिबिरांचे नियोजन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींची संख्या असली तरी १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. महापालिकेने आता येत्या १० सप्टेंबरपासून या अपंग व्यक्तींसाठी विभागनिहाय वैद्यकीय तपासणी शिबिरांचे नियोजन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.
महापालिकेत अपंग पुनर्वसन कायद्यानुसार अपंग व्यक्तींना सोयीसुविधा पुरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा आराखडाही तयार केला आहे तर सुमारे १४ कोटी रुपये चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शहरातील अपंगांचा सर्व्हे करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार, वैद्यकीय विभागाने आशा कर्मचारी तसेच विविध संस्थांच्या सुमारे ७५० कर्मचाºयांच्या माध्यमातून दि. ८ ते २४ आॅगस्ट या कालावधीत घरोघरी जाऊन सर्व्हे केला. ज्यांच्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहे, अशा लोकांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात आले. पथकाने शहरातील ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्या. त्यात ६३७१ व्यक्ती विविध प्रकारचे अपंग आढळून आले. प्रामुख्याने, सर्वेक्षणात ९०९ व्यक्ती या मानसिक संतुलन बिघडलेल्या निदर्शनास आल्या तर ७५६ व्यक्ती अंध आढळून आल्या. ८१४ व्यक्ती या मूकबधिर असून ३८९२ व्यक्तींना विविध प्रकारचे व्यंग आढळून आले. ६३७१ व्यक्तींपैकी १९३९ व्यक्तींकडेच जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मिळालेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले. सर्वाधिक १२७३ अपंग हे सिडको विभागात आढळून आले असून, सर्वात कमी ३०३ अपंग हे पश्चिम विभागात आढळून आले आहेत.