६४ वर्षांची रामलीला परंपरा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:09 AM2020-10-05T00:09:51+5:302020-10-05T00:57:36+5:30
नाशिक: गांधीनगरच्या मैदानावर दरवर्षी होणारी रामलिला आणि रावण दहनाचा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे होणार नसल्याने ६४ वर्षात प्रथमच रामलिलेची परंपरा खंडीत होणार आहे. येथील उत्सवाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी श्रीरामलिला समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक: गांधीनगरच्या मैदानावर दरवर्षी होणारी रामलिला आणि रावण दहनाचा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे होणार नसल्याने ६४ वर्षात प्रथमच रामलिलेची परंपरा खंडीत होणार आहे. येथील उत्सवाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी श्रीरामलिला समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाससाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार यंदा नवरात्रोत्सव आणि दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. गांधीनगर येथील रामलिाला उत्सव आणि रावण दहनाचा कार्यक्रम साजरा करण्याची अत्यंत जूनी परंपरा आहे. गेल्या ६४ वर्षांपासून अखंडपणे ही सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळ सुरू आहे. नाशिककर आणि रामलिला उत्सव यांचे एक नाते जुळले असून येथील सोहळा नाशिकचा लौकीक मानला जातो. ६५ व्या वर्षात पदार्पण करतांना यंदाचा उत्सवाबाबत कलावंत आणि आयोजकांमध्ये चांगलाच उत्साह होता.
देशावर उद्भवलेल्या संकटाच्या काळात श्रीरामलिला समितीने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेत यंदा रामलिला उत्सव आणि रावण दहन न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती उत्सव समितीचे महासचिव कपीलदेव शर्मा यांनी दिली. रामलिलेत काम करणाºया कलावंताना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी देखील सामाजिक जाणिवेतून रामलिला उत्सवाला अर्धविराम देण्याच्या निर्णयाला संमती दिली आहे.
-- इन्फो--
दुर्गा पूजा उत्सवही होणार रद्द
कारोनाच्या प्रादुर्भावामुळे यंंदा रामलिला आणि रावण दहनाबरोबरच गांधीनगर मैदानावर होणारा दुर्गापूजा महोत्सव देखील होणार नसल्याचे समजते. गर्दीमुळे कोरोनाचा प्रकोप होऊ नये यासाठी गांधीनगर प्रेस प्रबंधकांनी हे दोन्ही कार्यक्रम स्थगित केले आहेत.
--कोट--
रामलिला पाहाण्यासाठी दररोज होणारी हजारो नागरिकांची गर्दी आणि रावण दहनाच्या दिवशी ओसंडून वाहणारा जनमुदाय लक्षात घेता कोरोनामुळे यंदा उत्सव रद्द करण्यात आला आहे. देशावरील संकटाचा विचार करून समिती आणि कलावंतांनी सहमतीने हा निर्णय घेतला. गांधीनगर प्रेसच्या प्रबंधकांनी देखील यंदाच्या उत्सव घेऊ नये असे सुचिवले आहे.
- कपीलदेव शर्मा, महासचिव, श्रीरामलिला समिती