६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:28 AM2018-12-20T00:28:12+5:302018-12-20T00:28:48+5:30

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील.

 65 percent PF account 'link' | ६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’

६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’

Next

सातपूर : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील. आतापर्यंत ६५ टक्के खातेदारांनी आपले खाते लिंक केले असून, उर्वरित पीएफ खातेदारांनी ३१ डिसेंबरच्या आत आॅनलाइन केवायसी करून घ्यावे, असे आवाहन भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम.एम. अशरफ यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.  पीएफ आयुक्त अशरफ यांनी सांगितले की, पूर्वी पी.एफ. खातेदारांना आपल्या खात्यावरील रक्कम पाहण्यासाठी अथवा निधी काढण्यासाठी वारंवार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात यावे लागत होते आणि तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते. गर्दीमुळे कर्मचाऱ्यांना खातेदारांना सेवा देण्यास अडचण निर्माण होत होती. त्यात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यातील खातेदारांची परवड होत होती.
आता ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे. या अ‍ॅप्लिकेशनमुळे खातेदारांना आपल्या मोबाइलवर खात्यातील शिल्लक रक्कम, एकूण जमा रक्कम नियमित पाहता येईल. शिवाय खात्यातून काही रक्कम काढायची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. या अ‍ॅप्लिकेशनमुळे खातेदारांची गैरसोय होणार नाही, असा दावा भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी केला आहे.

Web Title:  65 percent PF account 'link'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.