बँकेचे अधिकारी भासवून ६५ हजारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:51+5:302021-08-24T04:19:51+5:30
जलतरण तलावाजवळील घाडगे नगर येथील चंद्रशेखर मल्लप्पा ईरमानी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सासरे मल्लिनाथ यु. हत्ती ...
जलतरण तलावाजवळील घाडगे नगर येथील चंद्रशेखर मल्लप्पा ईरमानी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सासरे मल्लिनाथ यु. हत्ती (८३) हे मुलीला व जावयाला भेटण्यासाठी नाशिकरोड येथे घरी आले होते. त्यांना गेल्या गुरुवारी दुपारी फोन केलेल्या इसमाने मी एसबीआय बँकेतून बोलत आहे. तुमचा केवायसी मॅच होत नाही. तो ऑनलाईन मॅच करावा लागेल असे सांगितले. त्याने हत्ती यांच्याकडून मोबाईलवरून आधारकार्ड व डेबिटकार्ड नंबर, येनो ॲपचा युजर आयडी, पासवर्ड याची माहिती घेतली. त्यांच्याकडून मोबाईलवर ओटीपी क्रमांक घेतला. नंतर काही वेळातच हत्ती यांच्या चिंचवड येथील एसबीआय शाखेच्या खात्यातून परस्पर ६५ हजार काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.