करसवलत योजनेमुळे तिजोरीत ६७ कोटींची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 01:29 AM2022-06-22T01:29:34+5:302022-06-22T01:30:20+5:30
करदात्यांना प्रोत्साहन देत आकर्षित करण्यासाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. याअंतर्गत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली गेली, तर जूनमध्ये दोन टक्के सवलत दिली जात असून त्यास प्रतिसाद मिळत आहे. शहरातील १ लाख ७७ हजार ८७२ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेत ६७ कोटी १० लाखांचा करभरणा केला आहे.
नाशिक : करदात्यांना प्रोत्साहन देत आकर्षित करण्यासाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. याअंतर्गत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली गेली, तर जूनमध्ये दोन टक्के सवलत दिली जात असून त्यास प्रतिसाद मिळत आहे. शहरातील १ लाख ७७ हजार ८७२ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेत ६७ कोटी १० लाखांचा करभरणा केला आहे.
महापालिकेच्या तिजोरीत सर्वाधिक भर घरपट्टी करातून पडते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी वेळे कर भरणा करावा यासाठी प्रशासनाकडून करसवलतीच्या योजना आणल्या जात आहे. नाशिक महापालिकेची घरपट्टीची थकबाकी साडेतीनशे कोटी, तर पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा दीडशे कोटींवर पोहोचल्याने आयुक्त रमेश पवार यांनी याकडे विशेष लक्ष केंद्रित केले. त्यानुसार करसवलत योजना लागू करून एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना सवलत जाहीर करण्यात आली. या सवलतीनुसार एप्रिल महिन्यात कर भरलेल्यांना पाच टक्के मिळाली, मे महिन्यात तीन टक्के, तर आता जून महिन्यात दोन टक्के सवलत दिली जात आहे. गत ८० दिवसांत १ लाख ७७ हजार ८७२ मिळकतधारकांनी करसवलत योजनेचा लाभ घेत ६७ कोटी १० लाखांची करभरणा केला आहे.
---------
करदात्यांना १ कोटी ६० लाखांची सूट
करसवलत योजनेमुळे एप्रिल महिन्यात २७ कोटी, मेमध्ये २५ कोटी २२ लाख, तर जूनमध्ये आत्तापर्यंत १२ कोटी ६२ लाखांची भर महापालिकेच्या तिजोरीत पडली आहे. तर करदात्यांना १ कोटी ६० लाख रुपयांची सुट मिळाली आहे. महिनाअखेरपर्यंतच ही सवलत योजना सुरू राहणार असून, लाभ घेण्याचे उपायुक्त (कर) अर्चना तांबे यांनी केले आहे.