६७५ बाधित; ३८९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:16+5:302021-03-09T04:18:16+5:30
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. ८) तब्बल ६७५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले ...
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. ८) तब्बल ६७५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, नाशिक शहरात ४ तर ग्रामीणमधून २ असे ६ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१४० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक बाधित झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २६ हजार ५७० वर पोहोचली असून, त्यातील एक लाख २० हजार २०४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ४,२२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९४.९७ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९४.९४, नाशिक ग्रामीण ९५.८७, मालेगाव शहरात ८९.८०, तर जिल्हाबाह्य ९३.२१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ६१ हजार ७८३ असून, त्यातील चार लाख ३२ हजार २५५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २६ हजार ५७० रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,९५८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.