प्रबळ इच्छाशक्तीद्वारे ६८ वर्षीय महिलेने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:21+5:302021-04-27T04:15:21+5:30

कळवण : प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या बळावर वैद्यकीय उपचारांना योग्य प्रतिसाद देणाऱ्या येथील सौ. पुष्पाताई भिकाजी कापडणे ...

A 68-year-old woman defeated Kelly Corona by a strong will | प्रबळ इच्छाशक्तीद्वारे ६८ वर्षीय महिलेने केली कोरोनावर मात

प्रबळ इच्छाशक्तीद्वारे ६८ वर्षीय महिलेने केली कोरोनावर मात

Next

कळवण : प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या बळावर वैद्यकीय उपचारांना योग्य प्रतिसाद देणाऱ्या येथील सौ. पुष्पाताई भिकाजी कापडणे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी वीस दिवसांच्या संघर्षानंतर कोरोनावर मात केली. रुग्णालयातून घरी परतल्यावर कुटुंबीयांनी त्यांचे फुलांच्या पायघड्या टाकून उत्साहात स्वागत केले.

कळवण येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कापडणे व त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी यांचे रिपोर्ट्स काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आले. घरीच विलगीकरणात राहून वैद्यकीय उपचार घेत असतानाच जितेंद्र यांच्या आई पुष्पाताई यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनाही घरीच वेगळ्या खोलीत उपचार सुरु केले. आठ दिवस घरी उपचार घेऊन फरक पडत नसल्याने मालेगाव येथे जाऊन एच.आर.सी.टी केल्यानंतर त्यात त्यांचा स्कोअर १७ आल्यामुळे पुढील उपचारांसाठी नाशिक येथे रुग्णालयात दाखल होण्याशिवाय पर्याय नव्हता. मग बेड मिळविण्यासाठी कापडणे परिवाराची कसरत सुरु झाली. रुग्णालय आणि बेडची शोधाशोध करण्यात दोन दिवस गेले. अखेर कळवण शहरातील काही डॉक्टरांनी प्रयत्न करुन नाशिक येथील लीलावती हॉस्पिटल येथे बेड उपलब्ध करुन दिले. वैद्यकीय उपचारास सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जितेंद्र व रोहिणी यांना पाच दिवसांच्या उपचारानंतर बरे वाटले. परंतु आई पुष्पाताई यांना डबल ऑक्सिजन लावून बाय पंप मशिन जोडण्यात आले. दोन बॅग प्लाझ्मा दिल्यामुळे त्यांना बरे वाटले. वीस दिवसांच्या उपचारानंतर आपल्यातील सकारात्मक ऊर्जा, उपचारांना दिलेला प्रतिसाद आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे कोरोनावर मात करण्यात पुष्पाताई यशस्वी ठरल्या.

एकंदरीतच वयाच्या ६८ व्या वर्षी मोठ्या हिमतीने कोरोनासारख्या गंभीर आजाराशी संघर्ष करून बऱ्या झालेल्या पुष्पाताई कापडणे यांची ही सकारात्मकता इतर रुग्णांमध्येही प्रेरणा निर्माण करणारी ठरणार आहे.

घरी झाले स्वागत

गेल्या वीस दिवसांपासून कोरोनाचा सामना केल्यानंतर पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेल्या पुष्पाताई यांचे कापडणे कुटुंबीयांनी औक्षण करून स्वागत केले. आईची सकारात्मक ऊर्जा आमच्यासाठी व सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे जितेंद्र कापडणे यांनी सांगितले.

कोट...

संक्रमित झाल्यानंतर घाबरून न जाता मानसिकदृष्ट्या सक्षम राहून वेळेवर योग्य उपचार घ्यावेत. आपल्यात सकारात्मक ऊर्जा आणि प्रबळ इच्छाशक्ती असल्यास आपण या आजारावर नक्कीच मात करु शकतो.

- पुष्पाताई कापडणे, कळवण

===Photopath===

260421\26nsk_28_26042021_13.jpg

===Caption===

पुष्पाताई कापडणे यांचे कुटुंबियांनी केले स्वागत.

Web Title: A 68-year-old woman defeated Kelly Corona by a strong will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.