मास्क न लावणा-या ६८९ नागरीकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:56 PM2020-09-28T22:56:07+5:302020-09-29T01:18:41+5:30
नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीत ६८९ ...
नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीत ६८९ नियमभंग करणाºया नागरीकांकडून एक लाख ३८ हजारचा
दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या महासभेत महापौरांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई वाढविली आहे. तर आता मास्क न लावणाºय तसेच आणि थुंकीबहाद्दरांवर कारवाईसाठी महापालिका पोलिसांची मदत घेणार आहे.
नाशिक शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बाधीतांची संख्या पन्नास हजाराकडे जात आहे. दररोज सुमारे आठशे ते एक हजार रूग्ण रोज आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत यावर वादळी चर्चा झाली होती. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन न करणाºया नागरीकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईत महापलिकेने पोलीस यंत्रणेची मदत घेण्याची सूचना महापौर कुलकर्णी केली होती. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी पोलीस यंत्रणेला पत्र दिले आहे. दरम्यान महापालिकेने नियमभंग करणाºया नागरिकांविरुध्द कारवाईला वेग दिला आहे. गेल्या २१ सप्टेंबर रोजी मास्क न लावणाºया पाच जणांकडून हजार रुपये, २२ तारखेला १३ जणांकडून २६०० आणि २३ सप्टेंबरला १८ जणांविरुध्द कारवाई करून ३६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जून महिन्यापासून ही कारवाई सुरू असून आतापर्यंत ६८९ जणांवर दंडात्मक कारवाई करून एक लाख ३८ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आला आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.