दिंडोरीतील द्राक्ष उत्पादकांना ६९ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:29 PM2020-09-14T22:29:29+5:302020-09-15T01:25:38+5:30

वणी : तालुक्यातील दिंडोरी व वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चार व वणी पोलीस ठाण्यात सात असे तालुक्यात एकुण ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची फसवणुक करणारांचे धाबे दणाणले आहे.

69 lakh to Dindori grape growers | दिंडोरीतील द्राक्ष उत्पादकांना ६९ लाखांना गंडा

दिंडोरीतील द्राक्ष उत्पादकांना ६९ लाखांना गंडा

Next
ठळक मुद्देफसवणुक : ११ संशयीत व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

वणी : तालुक्यातील दिंडोरी व वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चार व वणी पोलीस ठाण्यात सात असे तालुक्यात एकुण ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची फसवणुक करणारांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक जिल्ह्याचे भुमिपुत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी सुत्रे हाती घेताच शेतकºयांची फसवणुक फसवणुक करणाराविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची माहीती अशी मनोज दत्तात्रय गणोरे (खडकसुकेणे ) यांची ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांची द्राक्षे खरेदी करुन खोटे धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी अशोक कुमार तोलाराम रघुवंशी (गुजरात) यांचेसह तिघा व्यापाºयांविरूद्ध, प्रशांत भगवान गणोरे (खडक सुकेणे) यांची १ लाख ७४,०० रुपयांची द्राक्षे खरेदी करुन पैसे न देता खोटे धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी गोरक्षनाथ मधुकर शिरसाठ राहणार पिंपळगाव बसवंत यांचेवर गुन्हा दाखल करण्यातआला आहे. बापू पालखेडे (खडकसुकेणे) यांचे ३ लाख रुपये व सुभाष पंढरीनाथ गणोरे यांचे ४ लाख २५ हजाराची द्राक्षे खरेदी करुन खोटे धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी संजयसिंग राजपुत उर्फ टुनटुन राहणार साईफ्रुट कंपनी परफेक्ट मार्केट औरंगाबाद रोड नाशिक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव बळीराम ठोकर, खडकसुकेणे यांची १२ लाख ६६ हजार मनोज दत्तात्रय गणोरे यांची ६ लाख १५ हजाराची द्राक्षे खरेदी करुन पैसे न देता फसवणुक केल्याप्रकरणी विलास बाबुराव शिंदे राहाणार कृषी उत्पन्न बाजारसमीती नाशिक व इतर दोघे अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी पोलीस ठाण्यात जयेश हिरामन मेधने, लोखंडेवाडी यांची ४ लाख ९४५ केदु भामरे यांचे २ लाख ७४ हजार , स्वप्नील जाधव यांचे १ लाख रुपयांची द्राक्षे खरेदी करुन खात्यावर बॅलन्स नसताना धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी अमित दिनानाथ गुप्ता सुमित दिनानाथ गुप्ता दिनानाथ गुप्ता राहणार यमुना हाईट्स महालक्ष्मी नगर हिरावाडी नाशिक यांचेवर संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पंढरीनाथ चित्ते राहणार पांडाणे यांची ३ लाख ३९ हजार व नंदु कचरु कोंड यांची २ लाख २ हजार ६२० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी वैभव रमेश कावळे राहणार बोपेगाव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कचरु कोंड, ४२ राहणार पांडाणे यांची १ लाख १२ हजार ७०० माणिक एकनाथ बागुल यांचे १ लाख ८८ हजार ३४८ रुपये व कुंदन सदाशीव पाटील यांची १ लाख २० हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी वैभव रमेश कावळे रा हणार बोपेगाव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास रुंजा जाधव राहणार सोनजांब यांची २ लाख ४३ हजार ४६६ रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणीअमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता सर्व राहणार पिंपळगाव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माणिक गटकळ, मातेरेवाडी यांची ३ लाख ९५ हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी अमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर जाधव, राहणार सोनजांब यांची १ लाख ८० हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी अमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष पांडुरंग जोपळे राहणार दहीवी यांची ४ लाख ३५ हजार ७८० रुपयांची द्राक्षे खरेदी न करता फसवणुक केल्याप्रकरणी वैभव कचरु जाधव आमित गुप्ता सुमित गुप्ता दिनानाथ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टा?प पेमेंट, खात्यात रक्कम नसताना धनादेश देणे खोटे धनादेश देऊन संगनमताने ठकबाजी केल्याची कारणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: 69 lakh to Dindori grape growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.