कोरोनाकाळात शहरात ६९ अल्पवयीन मुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:45+5:302021-09-22T04:17:45+5:30
------ अपहरणाचे पोलीस ठाणेनिहाय गुन्हे नाशिकरोड : ११, अंबड : १०, भद्रकाली : ०६, पंचवटी : ०७, सरकारवाडा : ...
------
अपहरणाचे पोलीस ठाणेनिहाय गुन्हे
नाशिकरोड : ११, अंबड : १०, भद्रकाली : ०६, पंचवटी : ०७, सरकारवाडा : ०३, गंगापूर ०४, मुंबईनाका : ०४, आडगाव ०४, म्हसरुळ ०५, देवळाली कॅम्प : ०४, सातपूर : ०६, इंदिरानगर : ०५.
------
दहा टक्के मुलींचाच लागला शोध
अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात सर्वाधिक जवळपास ३० टक्के गुन्हे दाखल झाले आहेत. तर पोलीस आयुक्तालय परिसरात दाखल एकूण गुन्ह्यांपैकी ७ म्हणजेच जवळपास १० टक्के मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर इतर प्रकरणांतील मुलींचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
-----
प्रेमसंबंध कारणीभूत
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद, आर्थिक कारणे असतात. मात्र, प्रेमसंबंध हे प्रमुख कारण असल्याचे फिर्यादींमधून समोर आले आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून बहुतांश मुलींना फूस लावून पळवून नेले जाते.