सटाण्यात व्यापाऱ्याच्या मोटारीत सापडले ७ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:44 AM2019-03-31T01:44:01+5:302019-03-31T01:44:31+5:30
लोकसभा निवडणुकीमुळे रोकड व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असतानाच शनिवारी (दि. ३०) सटाणा येथे एका व्यापाऱ्याच्या मोटारीत सात लाख २० हजार रुपयांची रोकड सापडली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीमुळे रोकड व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असतानाच शनिवारी (दि. ३०) सटाणा येथे एका व्यापाऱ्याच्या मोटारीत सात लाख २० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. त्यामुळे भरारी पथक त्याची कसून चौकशी करीत आहे.
लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर होऊ नये तसेच मतदारांना प्रलोभने दाखवली जाऊ नये यासाठी निवडणूक शाखेने पथके तयार केली असून, रोख व्यवहार किंवा रोख रकमेच्या वाहतुकीवर करडी नजर आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. ३०) एका व्यापाºयाच्या मोटारीत ७ लाख २० हजार रुपयांची रोकड आढळली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. निवडणुकीसाठी नियुक्त पथकात निवडणूक शाखा, पोलीस आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आहे.
सून, एक कॅमेरामनदेखील असतो. सदरची रक्कम सापडल्याचे कळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने त्याची चौकशी सुरू केली आहे. संबंधिताने आपण व्यापारी असल्याचे सांगितल्याने त्याच्याकडील पावत्या मागविण्यात आल्या असून, त्याच्या बॅँक खात्याचीदेखील माहिती घेण्यात येत आहे. विशेषत: इतक्या मोठ्या रकमेचे त्याने यापूर्वी व्यवहार केले आहेत की नाही याचीदेखील तपासणी केली जात आहे.